राज्य गुप्तवार्ता उपायुक्तांकडून आढावा
By Admin | Updated: November 23, 2014 23:24 IST2014-11-23T23:24:08+5:302014-11-23T23:24:08+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे वर्धा आगमण व विविध कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपआयुक्त रंजन शर्मा यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला.

राज्य गुप्तवार्ता उपायुक्तांकडून आढावा
वर्धा : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे वर्धा आगमण व विविध कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपआयुक्त रंजन शर्मा यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत मटकर, शिक्षा मंडळाचे मंत्री संजय भार्गव तसेच महसूल व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आगमण बुधवार २६ नोव्हेंबर रोजी शिक्षा मंडळाच्या जी.एस. कॉमर्स कॉलेजच्या परिसरात तयार केलेल्या हेलिपॅडवर होईल. राष्ट्रपती विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर सायंकाळी ४.२४ वाजता कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या प्रांगणात तयार केलेल्या हेलिपॅडवरून प्रयाण करतील. या दरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रमाची व्यवस्था तसेच सुरक्षा विषयक आढावा यावेळी घेण्यात आला.
महात्मा गांधी ज्ञान मंदिर, शिक्षा मंडळाचा शतक महोत्सवी कार्यक्रम तसेच सेवाग्राम आश्रमाला भेट कार्यक्रमासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा पासेस तत्काळ तयार करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक पारस्कर यांनी राष्ट्रपतींच्या आगमनापासून तर प्रयाणापर्यंत विविध विभागाकडून करावयाच्या कामाबाबत माहिती दिली. विभाग प्रमुखांना दिलेली कामे तत्काळ पूर्ण करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्यात.(प्रतिनिधी)