ग्राहक सभेत घेतला समस्यांचा आढावा

By Admin | Updated: August 13, 2015 02:51 IST2015-08-13T02:51:10+5:302015-08-13T02:51:10+5:30

अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा शाखा यांची त्रैमासिक सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पांडूरंग मुडे होते.

Review of the issues taken by the customer | ग्राहक सभेत घेतला समस्यांचा आढावा

ग्राहक सभेत घेतला समस्यांचा आढावा


हिंगणघाट : अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा शाखा यांची त्रैमासिक सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पांडूरंग मुडे होते. विशेष निंमत्रित विजय पटवर्धन, भैय्या लूतडे उपस्थित होते. सभेत ग्राहकांशी सबंधीत समस्या, तक्रारींचा आढावा घेण्यात आला.
सभेत विषय पत्रिकेप्रमाणे विषयावर चर्चा केली. सदस्यांच्या संमतीने ठराव संमत करण्यात आलेत. हिंगणघाट तालुका व नगर, देवळी तालुका व नगर, समुद्रपूर तालुका, सिंदी (रेल्वे), कारंजा (घा.) येथील प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. बेहरे यांनी सागितले की, समुद्रपूर, मौजा नंदोरी येथील एका ग्राहकास तणनाशक औषधीमध्ये दुकानदाराने फसविल. याबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात प्रकरण दाखल केले. यामुळे ग्राहकास खर्च व सानुग्रह रक्क्म अशी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिलेला आहे. शेतकरी ग्राहकाने कोणताही अन्याय सहन करू नये. अन्यायाबाबत शेतकरी ग्राहकाने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे ते म्हणाले.
यावेळी कार्यकर्त्यांना वीज कंपनी, भूमापन कार्यालयाच्या अनेक तक्रारी असून वीज कंपनी ग्राहकांना अनुचित व्यापार व अनुचित सेवा देण्याकरिता वीज ग्राहकाने जागृत असावे, याची माहिती आपण त्यांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
या सभेत प्रामुख्याने डॉ. डगवार, प्रा. मानमोडे, उपाध्यक्ष अनिल भांगे, जनक पालीवाल, महेश दीक्षित, शिवचरण मिश्रा, काकडे, बोबडे, कोषाध्यक्ष खाडे, कार्यालय प्रमुख गुल्हाने, तेलरांधे, जोशी, किशोर मुटे यासह सर्व सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी सामुदायीक श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सहसचिव कवडेश्वर बोबडे यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Review of the issues taken by the customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.