परतीच्या पावसाचा वर्धा जिल्ह्यातील संत्राबागांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:03 IST2019-11-15T14:02:21+5:302019-11-15T14:03:24+5:30
तळेगाव तालुक्यातील संत्रा पिकाला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या भागातील ७२ हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून यापैकी ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांच्या फळबागांतील संत्रा फळाला गळती लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

परतीच्या पावसाचा वर्धा जिल्ह्यातील संत्राबागांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: तळेगाव तालुक्यातील संत्रा पिकाला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या भागातील ७२ हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून यापैकी ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांच्या फळबागांतील संत्रा फळाला गळती लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
तळेगाव, चिस्तूर, रानवाडी, बेलोरा, भिष्णूर, खडका, आनंदवाडी, भारसवाडा आदी गावांतील ७२ हेक्टर क्षेत्रात संत्र् याच्या बागा आहेत. त्यात सध्या अंबिया बहारचा संत्रा होता. मात्र परतीच्या पावसाने त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला व संत्रा पीक गळून पडू लागले. सप्टेंबर आॅक्टोबर महिन्यात पावसाचे पाणी बागेत साचल्याने फळांच्या देठांजवळ बुरशी येते व फळ गळून पडते. साचलेले पाणी बाहेर निघण्यास कुठूनच मार्ग नसल्याने हे पाणी जमिनितच मुरत राहते. यंदा ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. या पिकाच्या नुकसानाचा पंचनामा करून भरपाई मिळावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.