देवळी तालुक्याचा निकाल ८१़२२ टक्के

By Admin | Updated: June 19, 2014 00:14 IST2014-06-19T00:14:01+5:302014-06-19T00:14:01+5:30

शहरातील पाच माध्यतिक शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले़ जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून गुणानुक्रमे येण्याचा मान पटकावून ९८.८४ टक्के निकाल दिला.

The result of Deoli taluka is 8122 percent | देवळी तालुक्याचा निकाल ८१़२२ टक्के

देवळी तालुक्याचा निकाल ८१़२२ टक्के

देवळी : शहरातील पाच माध्यतिक शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले़ जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून गुणानुक्रमे येण्याचा मान पटकावून ९८.८४ टक्के निकाल दिला.
यात प्रथत चेतन बागडे ९३.६० टक्के, द्वितीय पौर्णिमा हिंगे ९१.८० टक्के पटकाविले. प्राविण्य श्रेणीत ६८, प्रथम ६३ व द्वितीय श्रेणीत ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशवंत कन्या माध्यमिक विद्यालयाने ८२.७५ टक्के निकाल दिला. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम तेजस्विनी लांबट ८३.४० टक्के, द्वितीय निकीता सुरकार ७८.६० टक्के व पूजा अंबेरे हिने ७८.२४ टक्के गुण घेत तृतीय क्रमांक राखला़ गुरुकुल विद्यानिकेतनचे १४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल दिला. यात प्रथम श्वेता परतके ९० टक्के, द्वितीय रिद्धी चौधरी ८८.६० टक्के व तृतीय संकेत मिर्झापूरे याने ८८.४० टक्के गुण मिळविले. ऩप़ माध्य़ विद्यालयाचा निकाल ८०.१४ टक्के लागला़ यात प्रथम प्रज्वल सहारे ८८.२० टक्के, द्वितीय कल्याणी भोयर ८४.६० टक्के व तिसरा मंगेश इंगोले याने ८४ टक्के गुण घेतले़ राजीव गांधी माध्य़ शाळेचा निकाल ६३.२४ टक्के निकाल लागला़ प्रथम प्रतिक दरणे ७३ टक्के, द्वितीय पृथ्वीराज विलायतकर ७२ व तिसरा अतुल लसने ६८ टक्के गुण घेतले़ गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे़(प्रतिनिधी)

Web Title: The result of Deoli taluka is 8122 percent