आदर्श पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर
By Admin | Updated: October 4, 2015 02:51 IST2015-10-04T02:51:10+5:302015-10-04T02:51:10+5:30
मानसिक, व्यवहारिक, ज्ञानदानाची आदर्श पिढी घडविण्याची मोलाची जबाबदारी शिक्षकांवर आहे. अभियंता चुकला तर एखादा पुल कोसळेल,....

आदर्श पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर
सुधीर मुनगंटीवार : जिल्हा परिषद शाळांतील उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव
वर्धा : मानसिक, व्यवहारिक, ज्ञानदानाची आदर्श पिढी घडविण्याची मोलाची जबाबदारी शिक्षकांवर आहे. अभियंता चुकला तर एखादा पुल कोसळेल, लेखाविषयक कामकाज लेखापालाकडून चुकले तर वित्तीय नुकसान होईल; परंतु एखादा शिक्षक चुकला, तर पूर्ण पिढी गारद होईल. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या गुणवत्तेने आदर्श निर्माण करावा, असे आवाहन वित्त व नियोजन, वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे, आ. प्रा. अनिल सोले, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, उपाध्यक्ष विलास कांबळे, स्वागताध्यक्ष तथा शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, डॉ. शिरीष गोडे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, शिक्षणाधिकारी धनराज तेलंग व्यासपीठावर विराजमान होते. यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमातील सत्कारमूर्ती
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक अजय येते, अब्दुल गफूर अब्दुल रशीर, दानशूर व्यक्ती विनेश काकडे, रवींद्र चौधरी, जे.के. दम्मानी, तंत्रस्रेही उपक्रमशील शिक्षक प्रकाश कांबळे, योगेश भडांगे, रवींद्र कडू, राजेंद्र गुजरकर, वासुदेव वरफडे, राजेंद्र गणवीर, स्वप्नील वैरागडे, अनिल नाईक, गजानन खोडे, अशोक आडे, प्रमोद काळबांडे, रजनीश फुलझेले, जयश्री तायडे, निलेश इंगळे, मनोज कथले, हेमंत टाकरस, वसंत खोडे, किशोर वाघ, उत्कृष्ट शिक्षक अनिल शंभरकर, सतीश बजाईन, भारती इखार, शंकर येरेकर, संजय नेहरोत्रा, अर्चना देशकर, योगेंद्र केचे, प्रल्हाद सोनुलकर यांचा तर शासकीय परीक्षा मंडळाने २०१४-१५ साली घेतलेल्या परीक्षेत विशेष प्रावीण्यप्राप्त सुहानी जोगे, हरिओम आंबटकर, आचल मानकर, पल्लवी ढोके, आदर्श राऊत, पल्लवी भूयार, खुशबू घोंगडे, शिवनी भोसले, तेजस्विनी मानकर, तन्मय घोडे, गीता पडीले, यामिनी साबळे, प्रतीक भस्मे, सोनाली नंदारे, ऋतुजा पठाडे या विद्यार्थ्यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला.