गांधींच्या स्वप्नातील रामराज्याचा संकल्प करा

By Admin | Updated: January 14, 2015 23:12 IST2015-01-14T23:12:46+5:302015-01-14T23:12:46+5:30

समाजातील ही अंध:कार दूर व्हावा याच दिशेने आम्ही कार्य करीत आहोत. आम्ही चांगले तर सारं जग चांगले. हीच प्रेरणा घेवून व संकल्प ठेवूनच कार्य केले पाहिजे. उत्तम कार्य करून इतरांना प्रेरणा

Resolve Ramrajya in Gandhi's dream | गांधींच्या स्वप्नातील रामराज्याचा संकल्प करा

गांधींच्या स्वप्नातील रामराज्याचा संकल्प करा

सुधीर मुनगंटीवार : सेवा व विद्याभूषण पुरस्कार वितरण सोहळा
वर्धा : समाजातील ही अंध:कार दूर व्हावा याच दिशेने आम्ही कार्य करीत आहोत. आम्ही चांगले तर सारं जग चांगले. हीच प्रेरणा घेवून व संकल्प ठेवूनच कार्य केले पाहिजे. उत्तम कार्य करून इतरांना प्रेरणा देण्याचे काम सेवार्थींनी केलेले आहे. समाजऋण समजून देशाप्रती कार्य केले पाहिजे. महात्मा गांधींच्या स्वप्नातील रामराज्य आणण्याचा संकल्प करावा, असे आवाहन वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जय महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने अग्निहोत्री कॉलेज कॅम्पस येथे बुधवारी संक्रांती स्रेहमिलन व सेवा सत्कार समारोहात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य अतिथी मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती अरूण चौधरी, राष्ट्रपती पुरुस्कृत हास्य व व्यंग्य शिल्पी प्रा. मधुप पांडेय, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार व चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी तर अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री विराजमान होते. यावेळी आठ जणांचा सेवा, तर १६ जणांना विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. अग्निहोत्री म्हणाले, नव्या सरकारकडून विदर्भ विकासासोबत वर्धा जिल्हाचा विकासची अपेक्षा आहे. यावेळी राष्ट्रपती पुरुस्कृत हास्य व व्यंग्य शिल्पी प्रा. मधुप पांडेय यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला संस्था सचिव शिवकुमारी अग्निहोत्री, पूजा अग्निहोत्री, रमेश मुरडीव, महेश त्रिवेदी, डॉ. राजीव त्रिवेदी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्यावतीने ना. मुनगंटीवार यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह तसेच मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव सचिन अग्निहोत्री यांनी केले, तर संस्थेचा आढावा प्रा. प्रफुल्ल दाते यांनी मांडला.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Resolve Ramrajya in Gandhi's dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.