शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

वर्धा लोकसभा मतदार संघातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: March 14, 2015 02:00 IST

स्थानिक लोकसभा मतदार संघात रेल्वेच्या अनेक समस्या आहेत़ यामुळे रेल्वे प्रवासी त्रस्त आहेत़ रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी खासदार रामदास तडस ...

वर्धा : स्थानिक लोकसभा मतदार संघात रेल्वेच्या अनेक समस्या आहेत़ यामुळे रेल्वे प्रवासी त्रस्त आहेत़ रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली़ शुक्रवारी त्यांनी मतदार संघातील रेल्वेच्या समस्यांबाबत निवेदन सादर केले़ नागपूर वर्धा नांदेड रेल्वे लाईनकरिता ११० कोटी रुपये या वित्तीय वर्षात देण्यात आलेत़ शिवाय अमरावती मोर्शी नरखेड या मार्गाच्या उर्वरित कामासाठी २५ कोटी रुपये देण्यात आले़ नागपूर ते वर्धा रेल्वेलाईन तिहेरीकरणासाठी रेल्वे बजेडमध्ये समावेश करण्यात आला़ याबद्दल तडस यांनी निवेदनात वैदर्भीय जनतेच्यावतीने आभार व्यक्त केले.वर्धा लोकसभा क्षेत्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच विनोबा भावे यांनी आपला वेळ घालविला आहे. यामुळे जिल्ह्याला महत्त्व प्राप्त झाले आहे़ हे महत्त्व लक्षात घेऊन मतदार संघातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी केली़ यात वर्धा ते पुणे विनोबा भावे एक्सप्रेस गाडी सुरू करावी, सेवाग्राम ते मुंबई महात्मा गांधी एक्स्प्रेस सुरू करावी, वर्धा रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय स्तराचे रेल्वेस्थानक बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, आर्वी-पुलगाव (शकुंतला एक्सप्रेस) मार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करावा, रेलसेवा बहाल करण्याबाबत निधी उपलब्ध करून द्यावा, पुलगाव ते आमला ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, धामणगाव रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपहार गृह, ओव्हर ब्रीज, शौचालय, संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्र वाढवावे, अपंगांकरिता रॅम्पची व्यवस्था करावी, सिंदी रेल्वेस्टेशनच्या सौंदर्यीकरणासह पार्किंग, उपहारगृह आदी व्यवस्था करावी, जलद गाड्या रेल्वे फलाटावर थांबविण्याबाबत कार्यवाही करावी, धामणगाव व हिंगणघाट यात्री निवास व फलाटाचे विस्तारिकरण करावे, चांदूर रेल्वे स्टेशनवर आरक्षण केंद्र देण्याची मागणी खासदार रामदास तडस यांनी निवेदनातून लावून धरली़शिवाय गाडी क्र. १२६६५ चेन्नई अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसला पुलगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, गाडी क्र. १२१६०/५९ जबलपूर अमरावती एक्सप्रेसला सिंदी रेल्वे व चांदूर रेल्वे येथे थांबा द्यावा, गाडी क्र. ११०४० गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सपे्रसचा सिंदी रेल्वेला थांबा द्यावा, गाडी क्र. १२११९/२० नागपूर-अमरावती इंटरसिटी एक्सप्रेसला सिंदी रेल्वे येथे थांबा द्यावा, गाडी क्र. ८४०१/०२ द्वारका एक्सप्रेसला चांदूर रेल्वे येथे थांबा द्यावा, आॅरेंन्स सिटी वरूड येथे सुपरफास्ट गाड्यांचे थांबे द्यावे, गाडी क्र. १२७९१/९२ चेन्नई जयपूर एक्सप्रेस, गाडी क्र. १६१२५/२६ चेन्नई जोधपूर एक्सप्रेस तसेच पटना सिंकदराबाद एक्सप्रेस गाड्यांना हिंगणघाट येथे थांबा देण्याची मागणी खा़ तडस यांनी निवेदनातून केली़(कार्यालय प्रतिनिधी)