शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा!
By Admin | Updated: February 7, 2017 00:21 IST2017-02-07T00:21:36+5:302017-02-07T00:21:36+5:30
धानपिक शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीचे अध्यक्ष राम महाजन यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा!
मुख्यमंत्र्यांना निवेदन : साकोलीत सर्वपक्षीय आंदोलन
साकोली : धानपिक शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय शेतकरी संकटमोचन समितीचे अध्यक्ष राम महाजन यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसिलदार ए.डब्ल्यु. खडतकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
मागण्यांमध्ये शेतीला २४ तास वीज पुरवठा करावा, सरकारने भारनियमन बंद करावे, शेतकऱ्यांचा शेतमाल व धानाला ३५०० रूपये प्रति क्विंटल भाव द्यावा, निवडणुकीपुर्वी दिलेले आश्वासन पाळावे, आधारभूत धान खरेदी केंद्र आॅक्टोंबर महिन्याच्या सुरवातीलाच सुरू करावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांना १० हजार रूपये पेंशन योजना देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात मधुकर लिचडे, अविनाश ब्राम्हणकर, डॉ. अजय तुमसर, नंदू समरीत, नरेश करंजेकर, श्रावण बोरकर, अंगराज समरीत, सुरेश बघेल यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)