अभिमान वाटावा अशा वर्धा शहराच्या निर्मितीचा संकल्प
By Admin | Updated: October 17, 2016 00:53 IST2016-10-17T00:53:55+5:302016-10-17T00:53:55+5:30
जगाला मार्गदर्शन करण्याची शक्ती असणारे, १५ वर्र्षे महात्मा गांधींचे कार्यक्षेत्र राहिलेले,

अभिमान वाटावा अशा वर्धा शहराच्या निर्मितीचा संकल्प
पुणे : केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रमुख पदाच्या ७ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते, त्यासाठी तब्बल साडेतीन हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. प्रमुख पदांसाठी एवढ्या मोठया संख्येने अर्ज येण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालिकेला अखेर स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात येऊन अनेक महिने उलटले तरी अद्याप त्यासाठी स्वतंत्र अधिकारीवर्ग नेमण्यात आला होता. तब्बल ३ हजार कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च केले जाणार आहेत. अवघ्या ५ वर्षांमध्ये या योजनेची अंमलबजावणी पूर्ण करायची आहे. त्यामुळे या कामांना गती मिळण्यासाठी स्वतंत्र अधिकारीवर्गाची आवश्यकता होती.
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी चीफ अर्बन प्लॅनर, हेड आॅफ ट्रान्स्पोर्ट, हेड आॅफ वॉटर आणि सिवेज, चीफ फायनान्शियल आॅफिसर, चीफ नॉलेज आॅफिसर, हेड आॅफ आॅपरेशन्स आणि सर्व्हिसेस आणि कंपनी सेक्रेटरी या ७ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी आतापर्यंत ३ हजार ५७९ जणांनी अर्ज केले आहेत. चीफ अर्बन प्लॅनर पदासाठी १९९, हेड आॅफ ट्रान्स्पोर्टसाठी १९७, हेड आॅफ वॉटर आणि सिवेजसाठी २४१, चीफ फायनान्शियल आॅफिसर १ हजार ३८०, चीफ नॉलेज आॅफिसरपदासाठी ३१७, हेड आॅफ आॅपरेशन्स आणि सर्व्हिसेस या जागेसाठी ६३९ आणि कंपनी सेक्रेटरी या पदासाठी ६०६ असे अर्ज आले आहेत. वरिष्ठ पदांसाठी प्रशासकीय कामांचा मोठा अनुभव आवश्यक असतो, त्यांनी विविध प्रकल्पांवर काम केले असणे आवश्यक होते. तरीही या पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
>अधिकाऱ्यांना मिळणार महिना ३ लाख रुपये वेतन
स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अर्ज मागविण्यात आलेल्या ७ प्रमुख पदांसाठी वार्षिक वेतन प्रत्येकी २५ ते ४० लाख इतके निश्चित करण्यात आले आहे. म्हणजे महिना सरासरी ३ लाख रुपये वेतन त्यांना मिळणार आहे. त्यामुळे या पदांसाठी आलेल्या अर्जांची संख्या प्रचंड असल्याचे दिसून येत आहे.