शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

आयुर्वेदात संशोधनाला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:56 AM

आयुर्वेदात संशोधनाला प्रचंड वाव असून या क्षेत्रातील अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयुर्वेदशास्त्र जगासमोर न्यावे. त्यासाठी वैद्यांनी त्यांची कार्यक्षमतावृद्धी आणि प्रायोगिकरणासाठी तत्पर राहून प्रयत्नशील असावे, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.

ठळक मुद्देवेदप्रकाश मिश्रा : माता, बाल संगोपनावरील परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुर्वेदात संशोधनाला प्रचंड वाव असून या क्षेत्रातील अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयुर्वेदशास्त्र जगासमोर न्यावे. त्यासाठी वैद्यांनी त्यांची कार्यक्षमतावृद्धी आणि प्रायोगिकरणासाठी तत्पर राहून प्रयत्नशील असावे, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व अनुसंधान केंद्र येथील बालरोग, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र तसेच सामुदायिक औषधीशास्त्र विभागाद्वारे सावंगी दत्ता मेघे सभागृृहात आयोजित माता व बाल संगोपनावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन समारोहात ते बोलत होते. यावेळी आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, महाविद्यालयाचे समन्वयक व्ही. आर. मेघे, प्रा. डॉ. सुभाषचंद्र वार्ष्णेय, डॉ. श्याम भुतडा, विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रीती देसाई, अनुसंधान निदेशक डॉ.रमेश देवल्ला, डॉ. वैशाली कुचेवार, डॉ. रेणु राठी, डॉ. श्रीहरी, डॉ. प्रेमकुमार बडवाईक, डॉ. प्रतीक्षा राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात अभिमत विद्यापीठाद्वारे वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातील माजी अधिष्ठाता व निदेशक डॉ. प्रेमवती तिवारी यांना ‘वत्सला’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रथम सत्रात डॉ. चारू बन्सल यांनी ‘गर्भिणीतील आहार व योग’ या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषदेचे डॉ. गोविंद रेड्डी, डॉ. रेणू राठी यांनी सुप्रजनन आणि गरोदरपणातील माता तसेच नवजात बालकांची काळजी, आहार-विहार व आयुर्वेदीय औषधाद्वारे विविध आजार सुयोग्यरीत्या प्रतिबंधित करण्याबाबत मार्गदर्शन केले.परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली येथील डॉ. सुजाता कदम यांनी ‘गर्भथान संस्कारातून स्वस्थ बालक निर्माण होण्यापूर्वी घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर शासकीय महाविद्यालय, वाराणसी येथील बालरोग विभाग प्रमुख डॉ. बी. एस. सिंग यांनी आयुर्वेदाद्वारे नवजात बालकांची घ्यावयाची काळजी यावर सैद्धांतिक व शास्त्रीय विवेचन केले. समारोपीय कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी, आयुर्वेदातील माता आणि बाल संगोपन क्षेत्रात अधिकाधिक संशोधन करून पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शोधनिबंधांचे अनुसंधान पत्रिकांमध्ये प्रकाशन करावे, असे आवाहन केले.या दोन दिवसीय परिसंवादात देशातील विविध राज्यातून सुमारे २५० आयुर्वेद अभ्यासक सहभागी झाले होते. परिसंवादात एकूण ६७ शोधनिबंध आणि ३४ पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले. यात पूर्णिमा घरी, श्यामलाल एस., दिव्या बाभूळकर, सुधा दसना, हर्षा गायकवाड, समीर घोलप, शिवनी इंगोले, नीलेश इंगळे, अस्मिता भद्रे, अवंती बोडखे यांना उत्कृष्ट शोधनिबंधाचे पुरस्कार देण्यात आले. पोस्टस सादरीकरणात चेतन भालकर, सुनंदा चतुर्वेदी, हर्षा गायकवाड यांना उत्कृष्ट पोस्टरचा पुरस्कार देण्यात आला. तर वक्तृत्व स्पर्धेत १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून मुस्कान खान हिला प्रथम, तर कुमार विक्रम साहू याला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला. परिसंवादाच्या आयोजनात धूतपापेश्वर, पेन्टा केअर, नागार्जुन फार्मा यांचे सहाय्य लाभले.