रोहितच्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By Admin | Updated: February 4, 2016 02:20 IST2016-02-04T02:20:10+5:302016-02-04T02:20:10+5:30

रोहित वेमुलाच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी.

Report a criminal case against the convicts of Rohit | रोहितच्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

रोहितच्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

निषेध मोर्चा : विद्यार्थ्यांचा सहभाग
समुद्रपूर : रोहित वेमुलाच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. यासाठी तालुक्यातील भारतीय विद्यार्थी मोर्च्याच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या निषेध मोर्चात विद्या विकास महाविद्यालय व विकास विद्यालय या दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग होता. भारतीय विद्यार्थी मोर्च्याचे संदीप कोवे, रोशन पाटील हर्षल उमरे, पुरोगामी चळवळीचे प्रीतम रंगारी, मनीष नांदे, अमित वासनिक, पवन पीदूरकर यांनी सदर मोर्च्याचे आयोजन केले होते.
विद्याविकास महाविद्यालय येथून घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. प्रदीप मुन अशोक डगवार, प्रदीप मेश्राम, सूरज कोल्हे, अमोल बनसोड, मुकेश पाटील, शैलेश कुत्तरमारे आदींची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)
समता सैनिक दल
वर्धा : समता सैनिक दल सिंदी (मेघे) सर्कल वर्धाच्या वतीने रोहित बेमुलाच्या आत्महत्येचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी यांना दोषींवर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाची सी.बी.आय. चौकशी करावी, रोहितच्या आत्महत्येस जबाबदार असणारे केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय, विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव, मानव संसाधन विकास मंत्री स्मृती ईराणी, ए.बी.व्ही.पी. चे मुख्य पदाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Report a criminal case against the convicts of Rohit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.