भूजल पुनर्भरणाने दुष्काळावर मात
By Admin | Updated: July 5, 2014 01:10 IST2014-07-05T01:10:41+5:302014-07-05T01:10:41+5:30
राज्यात पाणलोटनिहाय वॉटर बजेटिंगचा आराखडा तयार करावा. नदी नाल्याची पूर्वीची रूंदी, खोली जपावी, नदी नाल्याच्या पात्रातील कचारा साफ करावा.

भूजल पुनर्भरणाने दुष्काळावर मात
प्रफुल्ल लुंगे सेलू
राज्यात पाणलोटनिहाय वॉटर बजेटिंगचा आराखडा तयार करावा. नदी नाल्याची पूर्वीची रूंदी, खोली जपावी, नदी नाल्याच्या पात्रातील कचारा साफ करावा. यामुळे पुराच्या दिवसात वा नदीला पाणी वाहत असताना मोठ्या प्रमाणात पुनर्भरण होईल. भूजलांच्या उपलब्धतेनुसार पाणी उपस्यावर नियंत्रण ठेवावे़ या उपाय योजनामुळे भविष्यात येणाऱ्या पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल़
महाराष्ट्र ८० टक्के काळ्या पाषाणाने व्यापलेला आहे़ काळा पाषाण (डेकन ट्याप) हा अग्नी जन्य खडक आहे़ तो पृथ्वीच्या गर्भातून निघालेल्या लाव्हा रसामुळे तयार झालेला आहे़ या पाषाणाचे थर साधारण ३० ते ४० फुटाचे असतात़ या पाषाणाच्या दोन थरामध्ये साधारणात: ६ इंच पासून १५ फुटापर्यंत लाल माती (रेड बोल) अथवा ग्रिन बोलचा थर असतो़ पाषाणाच्या थराचा वरचा भाग सचिद्र, मधला भाग साधारण पक्का व खालचा भाग पक्का असतो़ यामध्ये बारिक भेगा असतात़ या पाषाणातील सचिंद्र तथा भेगाच्या पाषाणात जल साठा समावून ठेवण्याची क्षमता १ ते ३ टक्के असते़
महाराष्ट्रामध्ये नाले तथा लहान मोठ्या नद्यावर छोटे बंधारे मध्यम बंधारे तथा लहान-मोठी धरणे झालेली आहे़ पाणलोटाची कामे सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे़ याचा परिणाम भूजल साठा वाढविण्याकरिता नक्कीच झालेला आहे़ ओलिताच्या, पिण्याच्या पाण्याच्या तथा औद्योगिक क्षेत्राच्या विहिरींची कामे झालेली आहेत. असे असले तरी उन्हाळ्याच्या दिवसात दुष्काळाचा समाना करावा लागतो़ भूजलाचे पाणलोट निहाय वॉटर बजेटिंग भूजल सर्वेक्षण करून यंत्रणा राबविल्या जाते़ या यंत्रणेला मात्र पुरेसे अधिकार नाहीत.
दुष्काळ परिस्थितीवर मात करण्याकरिता भूतकाळात जाणे आवश्यक आहे़ भूतकाळात नदी नाले तथा मोठ्या नद्यावर बंधारे तथा मोठी धरणे नव्हती़ नदी नाल्यांना कोणताही अडथळा नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा पूर जात होते़ पुरामुळे नदी नाले स्वच्छ होत होते़ नैसर्गिक दृष्ट्या पुराच्या पाण्याच्या दबावामुळे भूगर्भात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या रिर्चाज द्वारे जल साठा वाढत होता़ छोटे मोठे बंधारे व धरणामुळे पावसाळ्यात नदी नाल्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले़ नदी नाल्यामध्ये झाडे झुडपांची संख्या वाढली़ गाळाचे प्रमाण वाढले व नदी नाले उथळ झाले़ यामुळे पावसाच्या दिवसात पुरामुळे होणोरे भूजल पुनर्भरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाला़