आॅटोरिक्षांच्या परवान्यांचे नुतनीकरण करा

By Admin | Updated: October 31, 2015 03:03 IST2015-10-31T03:03:32+5:302015-10-31T03:03:32+5:30

आॅटो रिक्षाचे परवाने नसलेल्या व मुदतबाह्य झालेल्या सर्व आॅटो रिक्षा चालकांनी आपल्या परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक आहे.

Renew the permission of the Internet | आॅटोरिक्षांच्या परवान्यांचे नुतनीकरण करा

आॅटोरिक्षांच्या परवान्यांचे नुतनीकरण करा

सतीश सहस्त्रबुद्धे : आॅटोरिक्षा तपासणी मोहिमेस प्रारंभ
वर्धा : आॅटो रिक्षाचे परवाने नसलेल्या व मुदतबाह्य झालेल्या सर्व आॅटो रिक्षा चालकांनी आपल्या परवान्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. आॅटो रिक्षा परवान्याचे नुतनीकरण १६ नोव्हेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे. ज्यांचे परवाने नुतनीकरण होणार नाही, ते कायमचे रद्द करण्यात येणार आहेत. परवाने नुतनीकरण न करता वापरल्या जाणाऱ्या सर्व आॅटो रिक्षाची तपासणी मोहीम शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे, अशी मााहिती अतिरिक्त परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी दिली.
परिवहन कार्यालयाच्या सभागृहात आॅटो रिक्षा युनियन व परिवहन विभागच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहस्त्रबुद्धे बोलत होते. उपपरिवहन अधिकारी विनोद जिचकार, सहायक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, आॅटो रिक्षा संघटनेचे प्रमुख देवा निखाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
नुतनीकरण न झालेल्या तसेच रद्द झालेल्या आॅटो रिक्षा परवान्याचे नुतनीकरण करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सांगतानाच सहस्त्रबुद्धे म्हणाले की, वर्धा जिल्ह्यातील ४ हजार २२९ आॅटो रिक्षा परवान्यांपैकी ३ हजार २०० परवान्यांचे मुदत संपूनही नुतनीकरण करण्यात आलेले नाही. आॅटो रिक्षा तपासणी मोहिमेमध्ये दोषी आढळणाऱ्या रिक्षांची नोंदणी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार निलंबित अथवा कायमची रद्द करून त्या रिक्षा तांत्रिकदृष्ट्या पुनर्वापरासाठी अपात्र करण्यात येणार आहे. या मोहिमेचे नियंत्रण करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. शिवाय विशेष पथके व धडक तपासणी मोहीम राबविण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही अतिरिक्त परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. आॅटो रिक्षा परवानाधारकांनी मुदतबाह्य परवान्याचे नुतनीकरण करून घ्यावे. ज्या आॅटो रिक्षा परवानाधारकाचे परवाने मुदतबाह्य झाले आहे, अशा परवानाधारकांना नव्याने परवाने प्राप्त करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या लॉटरीमध्ये अपात्र ठरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीला मोटार निरीक्षक दुलीसिंग राठोड, मोहन बोर्डे, अशपाक अहमद, आनंद मेश्राम, सहायक निरीक्षक एस.एस. सुरळकर, चव्हाण आदी उपस्थित होते. आॅटो रिक्षाच्या परवाना नुतनीकरणासाठी सवलत देण्यात यावी, अशी मागणी यावेळी वर्धा आॅटो रिक्षा युनियनतर्फे करण्यात आली. बैठकीमध्ये आॅटो रिक्षा परवाना धारक चालक, मालकांनी आपल्या समस्याही अधिकाऱ्यांसमोर कथन केल्या.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Renew the permission of the Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.