अश्लील छायाचित्र काढून युवतीचे लैंगिक शोषण
By Admin | Updated: March 27, 2015 01:19 IST2015-03-27T01:19:43+5:302015-03-27T01:19:43+5:30
बळजबरी करून युवतीचे अश्लील छायाचित्र काढून तिचे लैगिक शोषण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघड झाली.

अश्लील छायाचित्र काढून युवतीचे लैंगिक शोषण
वर्धा : बळजबरी करून युवतीचे अश्लील छायाचित्र काढून तिचे लैगिक शोषण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघड झाली. हा प्रकार सतत २५ दिवसांपासून सुरू असल्याचे पुढे आले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल असलेल्यांची नावे गणेश साबळे व अतुल ठाकरे अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रानुसार, २ मार्च रोजी पीडित युवती शिवाजी चौक येथे बँकेच्या शिकवणी वर्गाकरिता आली होती. ती घरी जात असताना तिची ओळख असलेला गणेश साबळे तिला आर्वी मार्गावर असलेल्या धरमपेठ महिला बँकेजवळ भेटला. तिला घरी सोडून देतो, असे म्हणत दुचाकीवर बसण्यास सांगितले. सदर युवती त्याच्या दुचाकीवर बसली असता तो तिला घरी न नेता कारागृह मार्गावर असलेल्या अग्रग्रामी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या घरात घेऊन गेला. तिथे अतुल ठाकरे आधीच हजर होता. यावेळी सदर युवतीने त्याचा विरोध केला असता तिचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरी केली. यावेळी गणेश याने सदर युवतीचे अश्लील छायाचित्र काढले. ते छायाचित्र दाखवून तो तिला सतत शारीरिक सुखाची मागणी करीत होता.
बदनामी होण्याच्या भीतीने सदर युवतीने काही वेळा त्याची मागणी पूर्ण केली; मात्र हा प्रकार वाढत असल्याने ती त्रस्त झाल्याने तीन अखेर या प्रकरणाची तक्रार शहर ठाण्यात केली.
तिच्या तक्रारीवरून गणेश साबळे व अतुल ठाकरे याच्याविरूद्ध भांदविच्या कलम ३७६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात कुणालाही अटक झाली नव्हती. (प्रतिनिधी)
युवतीचे छायाचित्र अद्यापही गणेशकडेच
या प्रकरणातील आरोपी गणेश साबळे याने सदर युवतीचे अश्लील छायाचित्र काढले. ते अद्यापही त्याच्याकडेच आहे. या छायाचित्राचा अनैतिक वापर तो करू शकतो. यामुळे पोलिसांनी त्याला लवकर अटक करून ती छायाचित्रे नष्ट करण्याची मागणी सदर युवतीने केली आहे. यातून तिची आणखी बदनामी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.