शिक्षकांच्या वेतनात नियमितता आणा!

By Admin | Updated: November 27, 2015 02:27 IST2015-11-27T02:27:27+5:302015-11-27T02:27:27+5:30

विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी समता शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मीना, ...

Regularization of teachers' salary! | शिक्षकांच्या वेतनात नियमितता आणा!

शिक्षकांच्या वेतनात नियमितता आणा!

जि.प. सीईआेंना शिक्षकांचे साकडे
वर्धा : विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी समता शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मीना, उपमुख्यकार्यकारी अधिकारी विवेक इलमे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्याशी प्रत्येकी स्वतंत्रपणे चर्चा करून निवेदने दिलीत. यात शिक्षकांच्या वेतनात नियमितता आणण्याची मागणी करण्यात आली.
चर्चेमध्ये शासन आदेशाप्रमाणे दरमहा वेतन वेळेवर, उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांचे याचिका क्र. ३६२५/२०१४ दि. १ आॅगस्ट २०१४ आदेशान्वये अपीलिय मुख्याध्यापकांना संरक्षण देऊन न्यायालयात दाद न मागणाऱ्या मुख्याध्यापकांना दुसऱ्या शाळेवर समयोजित करण्यात यावे. जेणेकरुन वाद न होता मुळच्या मुख्याध्यापकाला स्वतंत्रपणे कार्य करता येईल. आयकर कपातीची त्रैमासिक २४ क्युची कार्यवाही लगेच करण्यात यावीश रोस्टर मधील दोष लवकर दुरुस्त करण्यात यावेत, आदी मागण्या करण्यात आल्या.
शालेय पोषण आहाराचे अनुदान महिना भरताच ५ तारखेपर्यंत देण्यात यावे. एका महिन्याचे अड्व्हांस साहित्य देण्यात यावे, सन २०१४-१५ चे भविष्य निर्वाह निधी लेखा विवरण त्वरित देण्यात यावे., प्रत्येक उच्च प्राथमिक शाळेला ग्रा.पं. स्तरावरुन एक शिपाई नियुक्त करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी यासह अनेक मागण्या करण्यात आल्या. यात २६ नोव्हेंबर संविधानदिना पूर्वी भारतीय संविधानाची प्रत प्रत्येक शाळेला देण्यात यावी., जि.प. शेषफंडातील ओबीसी विद्यार्थी गणवेश २०१५-१६ ची रक्कम त्वरित वितरित करण्याचे आदेश देण्यात यावे., अस्थायी शिक्षकांना स्थायी केल्याच्या आदेशाची प्रत देण्यात यावी., शिकविण्याव्यतिरिक्त कामासाठी शिक्षकांवर कारवाई न करता मार्गदर्शन करून काम करण्यात यावे. व इतर महत्त्वपूर्ण मागण्यांविषयी चर्चा करण्यात आली.
चर्चेवेळी शिष्टमंडळाकडून जिल्हानेते सुरेश सांगोळे, जिल्हाध्यक्ष सुनील तेलतुंबडे, सरचिटणीस गौतम पाटील, कोषाध्यक्ष दिलीप वावरे, उपाध्यक्ष चरणदास चारभे व किशोर वानखेडे, महेंद्र आडे, अविनाश कांबळे, सुभाष लोहकरे, पुष्पराज झिलटे, सचिन शंभरकर आदींनी सहभाग घेतला.(प्रतिनिधी)

Web Title: Regularization of teachers' salary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.