शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्युपन्सी सर्टिफिकेट’विनाच मालमत्तेच्या विक्रीपत्राची नोंदणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

शासन निर्णयानुसार आता कुठलेही बांधकाम करताना परवानगीसाठी प्रत्येक स्तरावर प्राधिकृत कार्यालयाकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. जोता बांधकामाचे प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाकडून घेणे गरजेचे असताना जिल्ह्यातील भूविकासक, बिल्डर्स यांच्याकडून नियम पायदळी तुडविले जात आहे.

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुठल्याही मालमत्तेचे विक्रीपत्र नोंदणी करताना (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) विक्रीपत्रासोबत भोगवटा प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसा शासन निर्णयही आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एका अर्जदाराने निर्णयाच्या अंमल बजावणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाहीबाबत आदेश दिले; पण जिल्हा सहनिबंधक व दुय्यम निबंधकांनी याला केराची टोपली दाखविली.शासन निर्णयानुसार आता कुठलेही बांधकाम करताना परवानगीसाठी प्रत्येक स्तरावर प्राधिकृत कार्यालयाकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. जोता बांधकामाचे प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाकडून घेणे गरजेचे असताना जिल्ह्यातील भूविकासक, बिल्डर्स यांच्याकडून नियम पायदळी तुडविले जात आहे. कुठलीही मालमत्ता तसे स्वतंत्र बंगलो, रो-हाऊस, सदनिका आदींचे विक्रीपत्र नोंदणी करताना भोगवटा प्रमाणपत्र विक्रीपत्रोबत जोडणे बंधनकारक करण्याच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष वेधण्यात आले. अर्जदाराच्या पत्रावरून जिल्हाधिकारी भिमनवार यांनी जिल्हा सहनिबंधक मुद्रांक शुल्क, वर्धा तसेच दुय्यम निबंधक, सेलू यांना नियमानुसार कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. तसेच संबंधित दोन्ही कार्यालयांना केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदारास अवगत करण्याचेही कळविले होते. मात्र, ४५ दिवसांचा कालावधी लोटूनही जिल्हा सहनिबंधक, वर्धा आणि दुय्यम निबंधक कार्यालयाकडून माहिती दिली जात नसून लपवाछपवी केली जात आहे. या दोन्ही कार्यालयांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचीही अवहेलना करण्यात आली आहे. यामुळेच भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपन्सी सर्टिफिटेक) विनाच आर्थिक देवाण-घेवाण करून मालमत्तेच्या नोंदी केल्या जात असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे. जिल्हाधिकारी या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.म्हणे, केवळ ‘रिसेल’च्या नोंदी!जिल्हा सहनिबंधकांकडे विषयाच्या अनुषंगाने माहिती मागितली असता तीन वर्षांतील केवळ ‘रिसेल’च्या नोंदी सुरू आहेत. नवीन विक्रीची तुरळक प्रकरणे असल्याचे सांगून माहिती देण्याचे टाळले. यात कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही ‘हो’ मिळविला. त्यामुळे संशयाचे वातावरण आहे. या कार्यालयात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी