भुसावळ पॅसेंजरची आगमनाची वेळ कमी करा

By Admin | Updated: December 31, 2015 02:25 IST2015-12-31T02:25:22+5:302015-12-31T02:25:22+5:30

डिसेंबर २०१५ पासून वर्धा बल्लारशाह या पॅसेंजर गाडीची वेळ बदलून रेल्वेने ती सकाळी ७.१५ ऐवजी ६ वाजता केली आहे.

Reduce the arrival time of Bhusawal Passenger | भुसावळ पॅसेंजरची आगमनाची वेळ कमी करा

भुसावळ पॅसेंजरची आगमनाची वेळ कमी करा

चंद्रपूरकडे जात असलेल्या प्रवाश्यांची गोची
वर्धा : डिसेंबर २०१५ पासून वर्धा बल्लारशाह या पॅसेंजर गाडीची वेळ बदलून रेल्वेने ती सकाळी ७.१५ ऐवजी ६ वाजता केली आहे. त्यामुळे भुसावळ नागपूर पॅसेंजरने वर्धेला उतरून चंद्रपूरकडे जात असलेल्या प्रवाश्यांची गोची झाली आहे. त्यामुळे या गाडीची वर्धेच्या आगमनाची वेळ सकाळी ६.१५ वरून ५.४५ करा अशी मागणी या गाडीतील प्रवासी करीत आहे.
भुसावळ-नागपूर ही पॅसेंजर वर्धेला सकाळी ६.१५ वा पोहचते. पूर्वी बल्लारशाह पॅसेंजर ही वर्धा स्थानकावरून सकाळी ७.१५ ला सुटायची. त्यामुळे भुसावळ, शेगाव, अकोला येथून चंद्रपूरकडे जाणारे बरेच प्रवासी अनेक वर्षापासून वर्धा येथे उतरून वर्धा बल्लारशाह पॅसेंजरने हिंगणघाट, चंद्रपूर, बल्लारशाकडे जायचे. पण बल्लारशाह गाडी आता सहा वाजताच निघून जाते. त्यामुळे भुसावळ गाडीने आलेल्या प्रवाश्यांना बल्लारशाह गाडी भेटत नाही. परिणामी या मार्गाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होतात. त्यांना सेवाग्राम स्टेशनवर खिशाला कात्री लावून जावे लागते. व तेथे सुद्धा हिंगणघाटकडे जाणारी सोयीस्कर गाडी नसल्याने त्यांची पंचाईत होते.त्यामुळे या गाडीची सकाळी ६.१५ ही आगमनाची वेळ बदलून तिचे आगनमन वार्धा स्थानकावर ५.४५ होईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी प्रवासी करीत आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Reduce the arrival time of Bhusawal Passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.