शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

वृद्धाच्या डोळ्यांदेखत लालपरीने सहचारिणीस चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

कमलाबाई गोविंदराव ठाकरे (७०) आणि त्यांचे पती गोविंदराव ठाकरे (७५, रा. धाडी) हे दाम्पत्य सोबतीने गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास बँकेच्या कामानिमित्त साहूरला जाण्याकरिता निघाले होते. बस मिळावी म्हणून ते दोघेही धाडी येथील बसथांब्याकडे जात होते. यादरम्यान कमलाबाई आर्वी आगारातील एमएच ४० - एन ८४२९ क्रमांकाच्या वर्धा-वरुड या एसटी बसच्या मागच्या चाकामध्ये आल्या. यात चिरडल्या गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. 

ठळक मुद्देधाडीच्या बसथांब्यावरील अपघात : बँकेच्या कामाकरिता साहूरला जात होते दाम्पत्य

मंगेश ढवळेलोकमत न्यूज नेटवर्कसाहुर : वृद्धापकाळात पती-पत्नीच एकमेकांचा आधार असल्याने वृद्ध दाम्पत्य बँकेच्या कामानिमित्त सोबतीने निघाले होते. अशातच काळ बनून आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीने वृद्धाच्या डोळ्यांदेखत सहचारिणीस चिरडले. रस्त्यावर निपचित पडलेल्या आपल्या वृद्ध पत्नीला वाचविण्यासाठी वृद्धाने पूर्ण प्राण एकवटून मदतीची मागणी केली. लागलीच नागरिकांनी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या वृद्धेला रुग्णालयाकडे रवाना केले. पण, वाटेचत त्यांचा मृत्यू झाल्याने वृद्धाला मोठा धक्का बसला आहे. ही घटना धाडी येथील बसथांब्यावर घडली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कमलाबाई गोविंदराव ठाकरे (७०) आणि त्यांचे पती गोविंदराव ठाकरे (७५, रा. धाडी) हे दाम्पत्य सोबतीने गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास बँकेच्या कामानिमित्त साहूरला जाण्याकरिता निघाले होते. बस मिळावी म्हणून ते दोघेही धाडी येथील बसथांब्याकडे जात होते. यादरम्यान कमलाबाई आर्वी आगारातील एमएच ४० - एन ८४२९ क्रमांकाच्या वर्धा-वरुड या एसटी बसच्या मागच्या चाकामध्ये आल्या. यात चिरडल्या गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. डोळ्यांदेखत सहचारिणी रस्त्यावर तडफडत असताना पाहून गोविंदरावांचा गलबला सुरू झाला. मदतीसाठी त्यांनी थकलेल्या आवाजात टाहो फोडला. लागलीच समाजसेवक दिनेश लांडे, प्रशांत गावंडे, राहुल घोरमाडे, अनिल चोरे, देवराव भलावी व संदीप चोरे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांना धनराज गरजे यांच्या खासगी मिनीबसमध्ये टाकून वरुड येथील ग्रामीण रुग्णालयाकडे प्रवास सुरू केला. परंतु गंभीर दुखापत झाल्याने कमलाबाईंनी वाटेतच अखेरचा श्वास घेतला. या अपघाताने वृद्ध गोविंदराव यांचा वृद्धापकाळातील एकमेव आधार हिरावला आहे. अपघातानंतर आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बस ताब्यात घेऊन आष्टी पोलीस ठाण्यात नेऊन उभी केली. याप्रकरणी बसचालक अनिल उंदरे कारवाईच्या रडारवर असून, वृत्त लिहिस्तोवर आष्टी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली नव्हती. या प्रकरणी पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे. 

धाडी बसस्थानकासमोर रस्ता दुभाजकाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वारंवार अपघात घडल आहे.या सिमेंट मार्ग झाल्यामुळे वाहनेही सुसाट धावतात. त्यामुळे या मार्गावरील अपघात रोखण्याकरिता गतिरोधक देण्याची गरज आहे.दिलीप भाकरे, सदस्य, ग्रा.पं. धाडी

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू