महसूल, पोलीस व खनिकर्म विभागाची कारवाई : सर्वाधिक कारवाई हिंगणघाट तर सर्वात कमी कारंजा तालुक्यात गौरव देशमुख वायगाव (नि.)लिलाव झालेल्या व न झालेल्या घाटांतून रेतीचा अवैधरित्या उपसा केला जातो. या प्रकरणी जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कारवाई केली जात आहे. यात पाच महिन्यांत ४१९ प्रकरणांमध्ये १.९० कोटी रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.जिल्ह्यात आठही तहसीलदारांनी विविध ठिकाणी अवैध रेती वाहतुकीच्या प्रकरणांत कारवाई केली. प्रत्येक तहसीलदाराला दरमहा १५ ते २० प्रकरणांच्या कारवाईचे उद्दीष्ट दिले जाते. त्यानुसार १ एप्रिल ते ३१ आॅगस्टपर्यंत पाच महिन्यांत किमान ६४० प्रकरणांचे उद्दीष्ट असते. पैकी जिल्ह्यात ४१९ प्रकरणांत कारवाई करण्यात आली. यात १ कोटी ८९ लाख ३४ हजार ४८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हा महसूल शासनजमा करण्यात आला आहे. जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक सुरू आहे. परजिल्हा व राज्यातूनही रेतीची तस्करी केली जाते. रेतीची अवैध वाहतूक करणारे कारवाई प्रसंगी अनेकदा अधिकाऱ्याला मारहाण करतात. हिंगणघाट तालुक्यात तलाठी व कोतवालास मारहाण केल्याची घटना घडल्याचे अधिकारी सांगतात. असे असले तरी एक कोटीचा महसूल मिळाला आहे.
पाच महिन्यांत रेती माफियांकडून १.९० कोटींचा दंड वसूल
By admin | Updated: October 1, 2015 02:51 IST