धार्मिक दुराग्रहामुळे विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम

By Admin | Updated: June 15, 2015 02:10 IST2015-06-15T02:10:22+5:302015-06-15T02:10:22+5:30

महात्मा गाधींनी शिक्षण क्षेत्रात नई तालीमच्या माध्यमातून कृतिशिल उपक्रमांचा मार्ग दिला. बापूंचा विचार देशातील सर्व प्रकारची विषमता नष्ट करणारा आहे.

Rebellious results for students due to religious intrigue | धार्मिक दुराग्रहामुळे विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम

धार्मिक दुराग्रहामुळे विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम

अनिल सद्गोपाल : सेवाग्राम येथे शिक्षण विषयावर चवथ्या राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ
सेवाग्राम : महात्मा गाधींनी शिक्षण क्षेत्रात नई तालीमच्या माध्यमातून कृतिशिल उपक्रमांचा मार्ग दिला. बापूंचा विचार देशातील सर्व प्रकारची विषमता नष्ट करणारा आहे. तो आजही महत्त्वाचा ठरतो. धार्मिक दुराग्रहामुळे विद्यार्थ्यांवर विघातक परिणाम होतो. याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात केवळ मानवतेला जागा होती. शैक्षणिक क्षेत्रातील आजच्या बदलामुळे संस्कारशील व आदर्श विद्यार्थी घडू शकत नाही, असे विचार डॉ. अनिल सद्गोपाल यांनी व्यक्त केले.
सेवाग्राम येथील नई तालीम परिसरात शांती भवन येथे शिक्षणाचे बाजारीकरण आणि व्यापारीकरणाच्या विरोधात जनसंवादात सहभागी व शिक्षण क्षेत्राशी संबंधीत विचारक, शिक्षक व कार्यकर्त्यांची चवथी राष्ट्रीय परिषद रविवारपासून सुरू झाली. यात विचार व्यक्त करताना सद्गोपाल बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीची जीवनमूल्ये ठेवली. २२ आॅक्टोबर १९३७ मध्ये वर्धा येथे नई तालीमचे अधिवेशनात देशातील शैक्षणिक व्यवस्थेसंदर्भातील गांधींचे भाष्य आत्मचिंतन करणारे होते, असेही डॉ. सद्गोपाल म्हणाले.
कार्यशाळेचे उद्घाटन विचारवंत व शिक्षणमंचचे अध्यक्ष मेहेर इंजिनिअर यांच्या हस्ते झाले. यावेळी नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, रमेश पटनाईक, स्वागत समितीचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्याध्यक्ष अनिल फरसोले व सचिव विजय कोंबे उपस्थित होते.
डॉ. सुगन बरंठ व नई तालीमच्या विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म हे गीत गाऊन परिषदेला प्रारंभ केला. जयवंत मठकर यांनी वर्तमान प्रश्नांवर गांधी विचार सशक्त असल्याचे सांगितले. आयोजनाची भूमिका अनिल फरसोले यांनी मांडली. स्वागताध्यक्ष प्रदीप दाते यांनीही मनोगत व्यक्त केले. पहिल्या संत्राचे संचालन विजय कोंबे यांनी केले तर आभार प्रभाकर पुसदकर यांनी मानले. स्वागत समितीचे प्रा. डॉ. श्रीराम जाधव, रंजना दाते, नरेंद्र गाडेकर, शेख हाशम, प्रदीप दासगुप्ता, अविनाश सोमनाथे व किशोर अमृतकर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Rebellious results for students due to religious intrigue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.