बर्धन यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली

By Admin | Updated: January 7, 2016 02:49 IST2016-01-07T02:49:46+5:302016-01-07T02:49:46+5:30

कॉम्रेड बर्धन यांच्या निधनाने डाव्या चळवळीचा तसेच कामगार लढ्याचा एक खंदा मार्गदर्शक निघून गेला आहे.

The real tribute to Bardhan's work is to bring him forward | बर्धन यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली

बर्धन यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली

विजय जावंधिया : विविध सामाजिक संघटनांद्वारे अभिवादन
वर्धा : कॉम्रेड बर्धन यांच्या निधनाने डाव्या चळवळीचा तसेच कामगार लढ्याचा एक खंदा मार्गदर्शक निघून गेला आहे. सर्व कामगार, शेतकरी व शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून चळवळ उभी केली पाहिजे. बर्धन यांचे कार्य ताकतीने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजंली ठरेल असे मत कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले.
आयटक व विविध कामगार संघटनेच्या वतीने बर्धन यांना अभिवादन व सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम मंगळवारी बच्छराज धर्मशाळा वर्धा येथे घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी नत्थूजी होलगरे होते. प्रास्ताविक आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी केले. यावेळी अविनाश काकडे, स्कर्मिश खडसे, मनोहर पचारे, वामन भेंडे, असलम पठाण, निरज गुजर, यशवंत झाडे, महेश दुबे, संजय भगत, गुणवंत डकरे, प्रा. नूतन माळवी, गजेंद्र सुरकार, सिद्धार्थ तेलतुंबडे, दीपक कांबळे, प्रशांत गौरशेटीवार, देवानंद हाडके, देविदास देशमुख, सुरेश गोसावी, शंकर मोहदुरे, एस. पी. चतुरकर, रामदास जाभुळकर, विजय भगत, इंगोले, प्रदीप दाते, नंदकुमार वानखेडे, विजया पावडे, वंदना कोळणकर, मैना उईके, मंगला इंगोले, माला भगत, निर्मला सातपुडके, सुनंदा आखाडे, टोणपे, ज्ञानेश्वरी डंभारे, शोभा तिवारी, द्वारका इमडवार, कुंदा सावरकर यासह पदाधिकारी उपस्थित होते. आभार सुरेश गोसावी यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: The real tribute to Bardhan's work is to bring him forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.