पोलिसांबाबतचा विश्वास हिच पोलिसांची खरी शक्ती
By Admin | Updated: March 11, 2017 00:37 IST2017-03-11T00:37:55+5:302017-03-11T00:37:55+5:30
व्यसनामुळे समाजात लुटमार, भ्रष्टाचार, छेडखानी, चोरी, बलात्कार यासारख्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे.

पोलिसांबाबतचा विश्वास हिच पोलिसांची खरी शक्ती
रवींद्र किल्लेकर : सर्वधर्मीय ग्रामजयंती सोहळा
वर्धा : व्यसनामुळे समाजात लुटमार, भ्रष्टाचार, छेडखानी, चोरी, बलात्कार यासारख्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस असले तरी त्यांना नागरिकांचे सहकार्य गरजेचे असते. पोलिसांबाबत नागरिकांत असलेला विश्वास हीच पोलिसांची खरी शक्ती आहे. पोलीस व जनतेत सामंजस्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर यांनी केले.
ग्रामपंचायत जाऊळगाव येथे गुरूदेव सेवा मंडळ, सेक्युलर फ्रंट व लॉयन्स क्लब गांधी सिटी यांच्यातर्फे सर्वधर्मिय ग्रामजयंती सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम घोडे, सेक्यूलर फ्रंटचे संस्थापक सदस्य इमरान राही, अनिल नरेडी, सेवाग्राम पोलीसचे ठाणेदार भानुदास पिदुरकर, उपपोलीस निरीक्षक शंकर मोहोड, सरपंच रेखा वराडे,बोंद्रे, हरिष तांदळे, दारूबंदी मंडळाच्या अध्यक्ष शोभा खडसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निवृत्ती चौधरी मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविक सुभाष मसराम यांनी केले. संचालन विजय नगराळे यांनी तर आभार मंगेश झिलपे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)