ग्रामगीता अध्याय वाचन व प्रवचन
By Admin | Updated: August 3, 2015 01:54 IST2015-08-03T01:54:46+5:302015-08-03T01:54:46+5:30
येथील वळण मार्गालगत असलेल्या नटाळा (पुनर्वसन) परिसरातील माधवाश्रम येथे ग्रामगीता वाचन व प्रवचन झाले.

ग्रामगीता अध्याय वाचन व प्रवचन
सत्संग : सामूहिक वाचनाचा समारोप
वर्धा : येथील वळण मार्गालगत असलेल्या नटाळा (पुनर्वसन) परिसरातील माधवाश्रम येथे ग्रामगीता वाचन व प्रवचन झाले. गुरुकृपा भजन मंडळ व ग्रामगीता तत्त्वज्ञान प्रसार मंडळाच्यावतीने सयाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक ग्रामगीता वाचनाचा समारोप करण्यात आला.
यावेळी ग्रामगीता ग्रंथात सांगितलेले देवत्व, साधनपंचकातील संत चमत्कार या अध्यायाचे सामूहिक वाचन करण्यात आले. सयाजी महाराज व ठाकरे महाराज यांनी मार्गदर्शन केले. अरूण गोंधळे व जगदीश कडू यांनी यावेळी भजन सादर केले. राष्ट्रसंतानी ग्रामनाथाला अर्पण केलेल्या पत्रिकेचे सामूहिकपणे वाचन करण्यात आले.
यानंतर अध्यायाच्या शेवटी असलेले संतवचन व संतपरीचय याचे सौरभ वैरागडे याने वाचन केले. अध्यायाला अनुसरुन असलेल्या राष्ट्रसंतांची पत्रे या पुस्तकातील एका पत्राचे वाचन चंद्रशेखर दंढारे यांनी केले. अध्यायावरील विस्तृत विवेचन नामदेव ठाकरे यांनी केले. तुकडोजी महाराज यांचे विचार आत्मसात करण्याचे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक जयवंत भालेराव यांनी केले. प्रास्ताविक उध्दव कोल्हे यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला लीला भोसले, अविनाश बिसन, जया बोरकर, सुलोचना लाड, प्रदीप बोरकर, गोंविद राऊत, बंटी वाघ, संजय वाके, बाबाराव खंडारराव, नामदेव सावळे, उपाध्याय यांनी सहकार्य केले. यावेळी पुनर्वसन व शिक्षक कॉलनी परिसरातील गुरूदेवप्रेमी उपस्थित होते. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)