प्रेमापोटी गाठली मुंबापुरी, गर्भात बाळ घेत परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 05:00 AM2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:18+5:30

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता त्या मुलाला कुणाचे नाव द्यायचे, हा प्रश्न असतानाच वर्ध्यातील समाजसेविका मंगेशी मून यांनी पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी घेतल्याने मोठा आधार मिळाला आहे.पण, आई-वडिलांना अंधारात ठेवून शिक्षित मुला-मुलींनी अशी पावले उचलणे कितपत योग्य, हाही विचार करण्याची गरज आहे.

Reached Mumbapuri out of love, returned with a baby in her womb | प्रेमापोटी गाठली मुंबापुरी, गर्भात बाळ घेत परतली

प्रेमापोटी गाठली मुंबापुरी, गर्भात बाळ घेत परतली

Next
ठळक मुद्देधक्कादायक वास्तव : सोशल मीडियातून फसवणूक, दोन दिवसांपूर्वी गोंडस बाळाला दिला जन्म

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्ध्यात बी.एस.सीचे शिक्षण घेत असलेल्या युवतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईच्या युवकाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत अन् नंतर प्रेमात झाल्याने युवकाच्या बोलावण्यावरून युवतीने जन्मदात्यांना अंधारात ठेवून थेट मुंबई गाठली. दोघेही सोबत राहू लागल्याने आठ महिन्यांच्या कालावधीत युवतीला गर्भधारण झाली. युवकाने आपली जबाबदारी झटकत तिला मानसिक व शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली. ज्याच्यावर विश्वास टाकून मुंबईत गाठली, त्यानेच विश्वासघात केल्याने अखेर मुलीला गर्भात बाळ घेऊन वर्धा गाठावे लागले. दोन दिवसांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्मही दिला, पण खरा प्रश्न आहे, तो लग्नापूर्वीच बाळ जन्माला आल्याचा. समाज आता हे सत्य कसे पचवेल, याची चिंता जन्मदात्या माता-पित्यांना भेडसावत आहे.
आई-वडिलांनी मोठ्या विश्वासाने मुलीला बी.एस.सी.पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकू दिले. त्या मुलींनी आई-वडिलांपेक्षा थोड्या दिवसात फेसबुक फ्रेंड झालेल्या युवकावर विश्वास दाखवून कॉलेजमध्ये जात असल्याचे सांगत आपला फोन घरीच ठेवून ४ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबईचा रस्ता धरला. सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने शोधाशोध सुरू केली. तिचे मित्र-मैत्रिणी, कॉलेज व नातेवाईकांशी संपर्क साधून विचारपूस केली. मात्र, काहीच पत्ता लागला नाही. अखेर पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दिवसामागून दिवस लोटले मात्र, मुलीशी संपर्क झाला नसल्याने आई-वडिलाची चिंता वाढतच गेली. अशातच ऑगस्ट महिन्यात देवळी पोलीस ठाण्यातून आई-वडिलांना ‘तुमची मुलगी मिळाली आहे पण, तिची स्थिती खूप नाजूक आहे’ असा फोन आला. पोलिसांचे हे शब्द कानावर पडताच आई-वडिलांना मुलगी मिळाल्याचा आनंद झाला. त्यांनी इतरांनाही सांगत देवळी पोलीस ठाणे गाठले. मात्र, मुलगी गर्भवती असल्याचे त्यांना कळताच मोठा धक्का बसला. तिला विचारपूस केली तर ती काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती.
एकीकडे मुलगी मिळाल्याचा आनंद तर दुसरीकडे लग्नाशिवाय मुलगी गर्भवती असल्याचे वास्तव छळत असतानाही; शेवटी पोटचा गोळा दूर करणार तरी कसा, म्हणून तिला घरी घेऊन आले. काही वेळ गेल्यानंतर तिला काहीही न विचारता आणि शेजाऱ्यांकडे दुर्लक्ष करून मोठ्या खासगी रुग्णालयात नेले. तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असून तिचा गर्भपात करता येत नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता त्या मुलाला कुणाचे नाव द्यायचे, हा प्रश्न असतानाच वर्ध्यातील समाजसेविका मंगेशी मून यांनी पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी घेतल्याने मोठा आधार मिळाला आहे.पण, आई-वडिलांना अंधारात ठेवून शिक्षित मुला-मुलींनी अशी पावले उचलणे कितपत योग्य, हाही विचार करण्याची गरज आहे.

या मुलाचा बाप कोण?
मुलीने केलेली चूक आणि तिचा झालेला विश्वाघात यामुळे तिला जबर मानसिक धक्का बसला. कशीबशी ती मुंबईतून देवळी पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी विचारले, आई-वडिलांनी विचारले इतकेच काय तर डॉक्टरांनीही विचारले की, या मुलाचा बाप कोण? पण, विश्वासघाती बापाचे नाव घेण्याचीही मानसिकता नव्हती. अखेर डॉक्टरांच्या आग्रहानंतर तिने घडलेला सारा प्रकार सांगितला. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मानसिक धक्क्यातून बाहेर आणण्यासोबतच पुढील उपचार सुरू केलेत.

‘प्रहार’ने केला उपचाराचा खर्च
आई-वडिलांचीही परिस्थिती बेताचीच. त्यांनी सेवाग्राम येथे उपचाराकरिता तिला सेवाग्रामला दाखल केल्यानंतर त्यांची ओळख समाजसेविका मंगेशी मून यांच्याशी झाली. वडिलांनी घडलेला प्रकार त्यांच्यापुढे कथन केला. त्यांना धीर देत बाळ आणि आईच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेऊन त्याला नाव देण्याचा विश्वास दिला. इतकेच नव्हे, तर नियमानुसार एक करारनामाही करून दिला. तसेच मून यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष विकास दांडगे व आदित्य कोकडवार यांची ओळख करून दिली. त्यांनी रुग्णालयातील पहिल्या दिवसांपासून तर प्रसूतीकाळापर्यंतचा सर्व खर्च स्वीकारून सामाजिक बांधिलकी जोपासली.

Web Title: Reached Mumbapuri out of love, returned with a baby in her womb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.