सारथी बहुउद्देशीयद्वारे वंचितांना रवा-साखर
By Admin | Updated: November 2, 2016 00:45 IST2016-11-02T00:45:01+5:302016-11-02T00:45:01+5:30
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचे उधान यापासून आपल्या परिसरातील कुणीही वंचित राहू नये

सारथी बहुउद्देशीयद्वारे वंचितांना रवा-साखर
कारला चौकातील उपक्रम : दिवाळी साजरी करण्यास मदतीचा हात
वर्धा : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचे उधान यापासून आपल्या परिसरातील कुणीही वंचित राहू नये या उद्देशाने सारथी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून कारला चौक येथे गरजूंना रवा-साखर वाटप करण्यात आले. पिपरी परिसरातील नागरिकांनी यात पुढाकार घेतला. यावेळी खा. रामदास तडस, मानस उद्योग समुहाचे संचालक सुधीर दिवे, गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, जि.प. सदस्य अविनाश देव, भाजप तालुकाध्यक्ष मनोज तरारे, संस्थेचे संजय ठाकरे, पं.स. सदस्य अर्चना मुडे (वानखेडे) उपस्थित होते.
खा. तडस यांनी समाजात आजही गरीबांची संख्या मोठी आहे. ती दूर करण्यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यांनी विविध योजना राबविल्या आहेत. गरीबांना रवा-साखर वाटपाच्या कल्पनेमुळे समाजातील इतर लोकांनाही प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले. दिवे यांनी या कार्यात नि:स्वार्थ भाव आहे. अशाच कार्याची समाजाला गरज आहे, असे सांगितले. वाघ यांनी राजकारणात असून समाजसेवा कशी करावी, याचे हे उदाहरण होय, असे सांगितले.
देव यांनी गरीबांच्या घरी दिवाळी साजरी होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लाखमोलाचा असतो, असे सांगितले. गतवर्षीही गरीबांच्या घरची दिवाळी साजरी व्हावी म्हणून घरोघरी जावून मिष्टान्न वाटप केले होते, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रकाश महाराज वाघ यांचे गुरूदेव सेवा मंडळ मोझरीच्या सर्वाधिकारीपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन संजय ठाकरे यांनी केले तर आभार तायडे यांनी मानले. कार्यक्रमाला सुमित ढवळे, विशाल चौधरी, अतुल पाळेकर, विलास चौधरी, मनोहर नाईक, वैशाली नोहाटे, वसंत जाधव, शेषराव मुंगले, अजय धामनकर, सुनीता मोरे, दीपक कानेटकर, गिरीष कांबळे, अनिकेत कोटंबकर, सूर्यवंशी, विशाल भुते, प्रवीण वारनळकर, जयंत घिमे, नाखले, प्रकाश राऊत, चौधरी, धोंगडे, भोवरे, रोंधळे व संस्थेच्या सदस्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)