रथोत्सवाला १५२ वर्षांची परंपरा
By Admin | Updated: October 24, 2015 02:06 IST2015-10-24T02:06:39+5:302015-10-24T02:06:39+5:30
येथील सुमारे १५२ वर्षांची परंपरा असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सव यात्रा महोत्सव रविवार (दि.२५) रोजी साजरा होत आहे.

रथोत्सवाला १५२ वर्षांची परंपरा
बालाजी रथ यात्रा : जय्यत तयारी, भाविकांची गर्दी
वायगाव (निपाणी): येथील सुमारे १५२ वर्षांची परंपरा असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सव यात्रा महोत्सव रविवार (दि.२५) रोजी साजरा होत आहे. या यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून भाविकांची गर्दी वाढत आहे.
वाढती लोकसंख्या व गावाचा झालेला विकास यामुळे रथ गावातून फिरविणे कठीण जात असल्याने एकादशीच्या दिवशी गावातून लहान रथ फिरविण्यात येतो. या लहान रथाद्वारे शुक्रवारी गावातून प्रभातफेरी काढण्यात येते. यानंतर त्रयोदशीला मोठ्या रथात श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांच्या मूर्तीची स्थापना करून तो रथ गावातील मुख्य मार्गाने काढण्यात येतो. या रथयात्रेत भजन, दिंडी, लेझीम, टिपऱ्या व ‘हरि नारायण गोविंदा’च्या जयघोषाने वायगाव नगरी दुमदुमून जाते. हा रथ लोकांद्वारे ओढल्या जातो. या उत्सवाकरिता ट्रस्टचे अध्यक्ष सुनील तळवेकर, सल्लागार चंद्रकांत ठक्कर, यांच्यासह सदस्य व गावकरी कार्यरत आहेत. बालाजी भगवान हे वायगावसह जिल्ह्यातील श्रद्धास्थान झाले आहे.
रथोत्सवाची ऐतिहासिक पार्श्वभूमी
वायगाव येथील पूजाजी महाराज आंध्र प्रदेशातील गिरी येथे बालाजीच्या दर्शनासाठी पायदळ वारी करीत होते.
पूजाजी महाराज गिरी येथील नदीत स्थानकरिता गेले असता त्यांच्या हातात एक डबा आला तो डबा त्यांनी बाहेर आणून गिरी येथील बालाजी भगवान मंदिरात ठेवला आणि पूजा केली. नंतर तो डबा पूजाजी महाराजांनी वायगावाला आणला आणि खाली जागेवर ठेवून वरून तुराट्याचे मंडप बांधले त्या डब्याची लोक पूजा करू लागले. भजन पूजन आरतीला सुरुवात झाली. याठिकाणी स्वच्छ मनाने कामना केली जी पूर्ण होत अगेल्या याला सुरुवात १८६३ मधील असल्याने ज्येष्ठ नगारिक सांगत आहेत.
तीन रात्रीत उभारल्या गेले दगडात मंदिर
एका रात्री येथे चिरेदार दगडाचे मंदिर बनू लागले. मंदिर कोणी बनविले हे मात्र अजूनही माहीत झाले नाही. १८६४ पासून या मंदिरात भाविकांची गर्दी थोडी थोडी वाढू लागली होती. यामुळे गावातील वाघ नामक सुताराने रथाची निर्मिती केली. त्याच रथात आजही रथोत्सव होत आहे.
पूजाजी महाराजांनी आणलेला डबा जागृत होता. त्याला जर कोणाचा स्पर्श झाला तर त्यातून रक्त बाहेर येत असल्याची आख्यायिका गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. या मंदिरात श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांची मोठी मूर्ती स्थापन करण्यात आली.