पुलगावात रास्तो रोको आंदोलन
By Admin | Updated: October 30, 2014 22:57 IST2014-10-30T22:57:10+5:302014-10-30T22:57:10+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील, पाथर्डी तालुक्यात जवरखेड खालसा येथे २१ आॅक्टोबर रोजी झालेल्या हत्याकांडाचा बसपाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला़ बसपाने मोर्चा काढून रास्ता रोको

पुलगावात रास्तो रोको आंदोलन
पुलगाव : अहमदनगर जिल्ह्यातील, पाथर्डी तालुक्यात जवरखेड खालसा येथे २१ आॅक्टोबर रोजी झालेल्या हत्याकांडाचा बसपाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला़ बसपाने मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलनही केले़ यानंतर नायब तहसीलदार गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी पाली यांना निवेदन सादर करून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली़
खालसा येथील दलित कुटुंबातील संजय जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) व सुनील संजय जाधव (१९) या तिघांची समाजकंटक व मानसिक विकृतीच्या इसमांनी हल्ला करून निर्घृण हत्या केली.
या हत्याकांडाच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीने बुधवारी मोर्चा काढला़ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यानंतर सुमारे एक हजार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला अटक करून घेतली़ नायब तहसीलदार गायकवाड, डीवायएसपी पाली, पीएसआय पाटील यांना निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदविण्यात आला़
उमेश म्हैसकर, कुंदन जांभुळकर, राजू लोहकरे यांनी आरोपीला त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. दलितांवरील अन्याय, अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते़
या घटनेला बरेच दिवस लोटले असताना आरोपी अद्याप मोकाटच फिरत आहेत़
यामुळे दलितांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ आतातरी शासनाने दलितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली़
आंदोलनात वर्षा म्हैसकर, वर्षा जांभुळकर, रूपचंद सहारे, धर्मपाल गायकवाड, विनोद बोरकर, सोनू मेंढे, प्रकाश टेंभुर्णे, निलेश काळे, उत्तम चव्हाण, किशोर मेंढे, धम्मा बागडे, ईश्वर ठोंबरे, मंगेश गायकवाड, विकास मुळे, सदानंद टेंभुरकर, दीपक ढोणे, ब्राह्मणे, मनीष गोटे, विठ्ठल वाघमारे, गौरव मसुरकर आदींनी सहभाग घेतला़(शहर प्रतिनिधी)