वर्धेत आढळला दुर्मिळ हरणटोळ साप
By Admin | Updated: October 26, 2015 02:10 IST2015-10-26T02:10:33+5:302015-10-26T02:10:33+5:30
स्थानिक बापुराव देशमुख अभियांत्रिकी, सेवाग्राम परिसरात दुर्मिळ होत असलेला देखणा हरणटोळ साप आढळून आला.

वर्धेत आढळला दुर्मिळ हरणटोळ साप
वर्धा : स्थानिक बापुराव देशमुख अभियांत्रिकी, सेवाग्राम परिसरात दुर्मिळ होत असलेला देखणा हरणटोळ साप आढळून आला.
कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांना हिराव्या रंगाचा साप आढळून आला. याची माहिती प्राणिमित्र शुभम जळगावकर व सूरज तिरपुडे यांना देण्यात आली. त्यांनी पाहताक्षणी हा साप दुर्मिळ असा हरणटोळ असल्याचे सांगितले. सापाला सुखरूप पकडून वर्धा वनविभागाचे वनसंरक्षक मुळे यांच्या मार्गदर्शनात जंगलात सुखरूप सोडण्यात आले.
सदर साप हा निमविषारी असून संध्याच्या परिस्थितीत तो नामशेष होणाऱ्या मार्गावर आहे. या सापाला इंग्रजीमध्ये वाईन स्रेक म्हणून ओळखतात. या सापाविषयी त्याच्या प्रजातीविषयी तसेच तो कशा प्रकारे नामशेष होत चालला आहे याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना शुभम जळगावकर यांनी दिली. यावेळी पीपल्स फॉर अॅनिमल्सचे प्राणिमित्र लखन येवले, स्वप्निल गजभिये उपस्थित होते. हा साप पाहण्यासाठी नागरिकांनाही गर्दी केली होती.(शहर प्रतिनिधी)