बोरधरण परिसरात दुर्मीळ निळ्या टोपाचा कस्तूर

By Admin | Updated: April 15, 2016 02:36 IST2016-04-15T02:36:41+5:302016-04-15T02:36:41+5:30

जिल्ह्यातील बोरधरण परिसरात पहिल्यांदाच दुर्मीळ निळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी आढळला. वर्धेतील पक्षी निरीक्षक राहुल वकारे यांनी त्याची नोंद केली आहे.

Rare blue toppling in Bordhurd area | बोरधरण परिसरात दुर्मीळ निळ्या टोपाचा कस्तूर

बोरधरण परिसरात दुर्मीळ निळ्या टोपाचा कस्तूर

वर्धेतील पक्षी वैभवात भर : बहारच्या पक्षी निरीक्षकाची नोंद
वर्धा : जिल्ह्यातील बोरधरण परिसरात पहिल्यांदाच दुर्मीळ निळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी आढळला. वर्धेतील पक्षी निरीक्षक राहुल वकारे यांनी त्याची नोंद केली आहे.
हा पक्षी उन्हाळ्यामध्ये हिमालयात व हिवाळ्यामध्ये मुख्यत: भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्या शेजारी उभ्या असलेल्या डोंगरांच्या रांगात स्थलांतर करतो. पानगळीची आर्द्र जंगले, सदाहरीत मध्यम आकाराची जंगले, कॉफिच्या लागवडीची क्षेत्रे आणि दाट बांबूच्या जंगलात राहणारा हा पक्षी हिवाळ्यात जवळजवळ संपूर्ण भारतात तर उन्हाळ्यात काश्मीर, हिमालयात १००० ते ३००० मीटर उंचीपर्यंतच्या क्षेत्रात, अरुणाचल प्रदेश, नागालॅँड व मेघालय या ठिकाणी आढळतो. बोरमध्ये पारा ४० डिग्री वर पोहचला असल्यानंतरही हा पक्षी या उष्ण भागात कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निळ्या टोपीचा कस्तूर असे त्याचे मराठीत असून निळ्या डोक्याचा कस्तूर या नावाने सुध्दा ओळखले जाते. इंग्रजीमध्ये त्याला ब्ल्यु कॅप्ड रॉक थ्रश किंवा ब्ल्यु हेडेड रॉक थ्रश या नावाने संबोधले जाते. हिंदीमध्ये याला नीलसिर कस्तूरी म्हटल्या जाते. जलकाद्य या कुळातील पक्षी असून याचे शास्त्रीय नाव मोनटींकोला सिक्लोरींकह्स असे आहे. निळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी साधारण १७ से.मी. आकाराचा असतो. यातील नर पाठीकडून गडद निळा आणि काळा, डोके व कंठ निळा, पोटाकडून तांबुस- पिंगट असा असतो. नराच्या पंखांवर पांढऱ्या रंगाचा पट्टा दिसून येतो.
यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा तलाव परिसरात २०१४ मध्ये मार्च व मे महिन्यात या पक्षाची नोंद झाली होती. या पक्षाचे छायाचित्र न मिळाल्यामुळे यवतमाळच्या पक्षी सुचीत अधिकृत नोंद करता आली नाही नव्हती. अमरावती जिल्ह्यात या पक्षाची नोंद असल्याची माहिती अमरावतीचे पक्षी व वन्यजीव अभ्यासक डॉ. जयंत वडतकर यांनी दिला. तसेच हा पक्षी भटक्या असून क्वचितच आढळतो, अशी माहिती दिली.
बोरधरणाच्या परिसरात बहार नेचर फाऊंडेशनचे सदस्य राहुल वकारे, पवन दरणे व सारांश फत्तेपुरीया पक्षी निरीक्षणासाठी २२ मार्च रोजी गेले होते. तेथील सागाच्या पानगळी भागात दुर्मीळ निळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी राहुल वकरे यांना आढळला असता त्यांनी तो कॅमेराबद्ध केला.(प्रतिनिधी)

लेप्रेसी फाउंडेशन ठरते पक्ष्यांचे नंदनवन
वर्धा- शहरातील महात्मा गांधी लेप्रेसी फाउंडेशनचा परिसर हा जैवविविधीतेने नटलेला एक समृद्ध अधिवास आहे. या परिसरात पक्षीअभ्यासकाने तीन नव्या पक्षांची नोंद घेतलेली आहे. यात वृक्ष चरचरी, लाल छातीची लिटकूरी व सिकीसचा वटवट्या या पक्षांचा त्यात समावेश आहे.
वृक्ष चरचरी या पक्षाला इंग्रजीत ट्री पिपिट असे म्हणतात. साधारणत: चिमणीच्या आकारा एवढा हा पक्षी हिरवट तपकिरी रंगाचा व त्यावर गर्द तपकिरी रेषा असतात. हे पक्षी आपल्याकडे हिवाळ्यात स्थलांतर करून येतात. लाल लिटकूरी या पक्षाला लाल छातीची माशिमार असेही म्हणतात, तर इंग्रजीत रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर म्हणतात. आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेल्या या पक्षाचा कंठ व छाती नारंगी रंगाची असते. हा पक्षी महाराष्ट्रासह दक्षिणेकडील कर्नाटक या भागातील हिवाळी पाहुणा होय. या नोंदीतील तिसरी नोंद सिकीसचा वटवटया असून इंग्रजीत सिकीस वार्बलर असे म्हणतात. आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला हा पक्षी वरुन फिक्कट करड्या व खालून भूरकट रंगाचा असून चोच किंचीत लांब असते. याची विण वायव्य भारतासह पाकिस्तानात होते. हे पक्षी देखील आपल्याकडील हिवाळी पाहुणे होय.

Web Title: Rare blue toppling in Bordhurd area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.