अफरातफर करणाऱ्या तलाठ्याला अटक

By Admin | Updated: November 14, 2016 00:50 IST2016-11-14T00:50:22+5:302016-11-14T00:50:22+5:30

कोरा साझा क्र. ४३ मधील तलाठ्याने शेतसारा अकृषक कराच्या रकमेत अफरातफर केली.

Rapist arrested | अफरातफर करणाऱ्या तलाठ्याला अटक

अफरातफर करणाऱ्या तलाठ्याला अटक

५९ हजार ७२९ रुपये हस्तगत : गिरड पोलिसांची कारवाई
गिरड : कोरा साझा क्र. ४३ मधील तलाठ्याने शेतसारा अकृषक कराच्या रकमेत अफरातफर केली. याबाबतच्या तक्रारीवरून गिरड पोलिसानी तलाठी चंद्रशेखर डोये याला रकमेसह त्याच्या खार्परा गावातून अटक केली. त्याच्याकडून ५९ हजार ७२९ रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई शुक्रवारीच रात्री करण्यात आली.
कोरा साझा क्र. ४३ चे तलाठी चंद्रशेखर डोये (५८) यांनी शेतसारा अकृषक कराच्या रकमेत अफरातफर केल्याचे महसूल विभागाच्या प्राथमिक चौकशीत उघड झाले. डोये यांनी २०१५-१६ मध्ये कोरा साझा ४३ चे कामकाज सांभाळत असताना शेतकरी विजय शेळकेसह अन्य शेतकऱ्यांकडून शेतसारा म्हणून ५९ हजार ७२९ रुपये वसूल केले. या रकमेचा अपहार करीत शासनाची फसवणूक केली. अफरातफर सिद्ध होताच तलाठ्याला बडतर्फ करण्यात आले होते; पण पुढील कारवाई थंड होती. या प्रकरणी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील यांच्या सूचनेवरून कोरा मंडळ अधिकारी रवींद्र चकोले यांनी डोये यांच्याविरूद्ध गिरड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत ठाणेदार सुखराम थोटे यांनी चौकशी सुरू केली. सदर तलाठ्याच्या हिंगणघाट येथील घराची झडती घेतली; पण याची माहिती मिळताच तलाठी पसार झाला होता. शुक्रवारीच रात्री गिरड पोलिसांनी तलाठ्याचे नागपूर जिल्ह्यातील खार्पला हे मूळ गाव गाठले. तलाठ्याचे घर शोधून भादंविच्या कलम ४०९ अन्वये अफरातफर केलेल्या ५९ हजार ७२९ रुपयांच्या रकमेसह त्याला अटक करण्यात आली. अटकेची कारवाई गिरडचे ठाणेदार सुखराम थोटे, जमादार दादाजी शंभरकर, रामदास दराडे, गजानन राऊत, प्रशांत ठोंबरे आदींनी पार पाडली. पूढील तपास गिरड पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: Rapist arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.