शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रापमच्या विभाग नियंत्रकांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:17 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून असलेल्या तरुण-तरुणांना मिळणाऱ्या मानधनातून प्रोफेशन टॅक्सच्या नावाखाली १७५ रुपयांची कपात केली जात आहे.

ठळक मुद्देयुवा परिवर्तन की आवाजचे आंदोलन : प्रोफेशनल टॅक्स कपातीचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून असलेल्या तरुण-तरुणांना मिळणाऱ्या मानधनातून प्रोफेशन टॅक्सच्या नावाखाली १७५ रुपयांची कपात केली जात आहे. हा प्रकार आमच्यावरील अन्याय असल्याचा आरोप करीत शनिवारी सदर तरुण-तरुणींनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात रापमच्या विभाग नियंत्रकांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.रापमच्या वर्धा विभागाच्या अधिकारात येणाऱ्या कार्यशाळेत सुमारे ६१ तरुण-तरुणी शिकाऊ उमेदवार म्हणून विविध विषयांचे प्रशिक्षण घेत आहेत. इतकेच नव्हे तर या तरुणांना सरकारच्यावतीने सुमारे ७ हजार ७६३ रुपये मानधन दिले जाते. परंतु, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या मानधनातून रापमच्या वर्धा विभागाच्यावतीने प्रोफेशनल टॅक्सचे कारण पुढे करीत चक्क १७५ रुपयांची कपात करण्यात आली. हा प्रकार काही तरुणांच्या निदर्शनास येताच त्यांनी रापमच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. परंतु, त्यांच्याकडून उडवा-उडवीचे उत्तरे देत थेट सीआर खराब करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर सदर तरुण-तरुणींनी आपली समस्या युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्याकडे मांडली. त्यावर निहाल पांडे यांच्या नेतृत्त्वात सदर शिकाऊ उमेदवारांनी शनिवारी रापमच्या वर्धा विभाग नियंत्रक कार्यालय गाठले. शिवाय विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांच्या दालनात ठिय्या देत आपली समस्या मांडली. यावेळी झालेल्या चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.कपात करणारा वर्धा विभाग एकमेवशिकाऊ उमेदवारांना देण्यात येणाऱ्या मानधनातून प्रोफेशनल टॅक्सच्या नावाखाली कपात केवळ वर्धा विभागातच करण्यात आली आहे. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, भंडारा या विभागात कुठल्याही प्रकारची कपात करण्यात येत नसून हा आमच्यावरील अन्याय असल्याचा आरोप करीत सदर कपात तात्काळ मागे घेऊन कपात केलेली रक्कम परत करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटून लावली होती.परीक्षेपासून वंचित राहण्याची भीतीज्यांची नियुक्ती ज्या महिन्यात झाली त्या महिन्याचा आधार घेत परीक्षा घेतली जाईल असे रापमच्या अधिकाºयांच्यावतीने तोंडी सांगितले जात आहे. त्यामुळे एकूण विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, योग्य पाऊल उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली.महिला अधिकाऱ्याकडून सीआर खराब करण्याची धमकीविद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनातून करण्यात आलेल्या कपातीबाबत सदर काही शिकाऊ तरुण-तरुणींनी रापमच्या डीपीओ करिष्मा शर्मा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे त्याबाबतची लेखी नियमावली आहे. तुम्ही जास्त दबाब आणल्यास किंवा कुठलेही आंदोलन केल्यास तूमचा सीआर खराब करू अशी धमकी दिल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे याची चौकशी करून सदर महिला अधिकाºयांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणीही याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केली.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळTaxकर