बापाचा मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: July 4, 2016 01:39 IST2016-07-04T01:39:12+5:302016-07-04T01:39:12+5:30

नजीकच्या करंजी (काजी) येथील एका बापानेच आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

Rape of father's daughter | बापाचा मुलीवर बलात्कार

बापाचा मुलीवर बलात्कार

वर्धा : नजीकच्या करंजी (काजी) येथील एका बापानेच आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी जि.प. शाळेच्या शिक्षिकेने सेवाग्राम पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्या नराधम बापाविरूद्ध बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलीस सुत्रानुसार, १४ वर्षीय पीडित मुलगी घरी भावासोबत झोपून असता आरोपी बापाने भावाला बाजूला करून स्वत:च्या मुलीवरच बळजबरी केली. सदर घटनेची माहिती पीडितेने जि.प. शाळेतील एका शिक्षिकेला देताच शिक्षिकेने घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना दिली. तक्रारीवरून पोलिसांनी करंजी काजी भागातील रहिवासी असलेल्या बापाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Rape of father's daughter