ं‘पीक कापणी प्रयोग’ रॅण्डम पद्धतीने राबवा
By Admin | Updated: October 9, 2015 02:31 IST2015-10-09T02:31:02+5:302015-10-09T02:31:02+5:30
जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत सोयाबीन व कापूस उत्पादनात अनाकलनीय घट येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल होत असल्याचे चित्र आहे.

ं‘पीक कापणी प्रयोग’ रॅण्डम पद्धतीने राबवा
खासदारांचे निवेदन : नजरअंदाज पैसेवारी चुकीची
वर्धा : जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत सोयाबीन व कापूस उत्पादनात अनाकलनीय घट येत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल होत असल्याचे चित्र आहे. अशात शासनाच्यावतीने जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेली नजर अंदाज आणेवारी ६७ दाखविण्यात आली आहे. ही आणेवारी चुकीची ठरत असून जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत रॅण्डम पद्धतीने पीक कापणी प्रयोग राबविण्याबाबतचे निवेदन खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत भाजपच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या वर्षीच्या खरीप हंगामात १५ दिवस आधीपर्यंत सोयाबीन व कापूस उत्पादनात चांगले उत्पन्न देवून जाईल, असा एकंदर सर्वांचाच समज होता. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सोयाबीन पीक काढणीची वेळ जवळ येवू लागली व निर्माण झालेल्या आनंदावर विरजन पडले व शेतकरी हवालदिल झाला. पहिल्या पीक काढणीच्या टप्प्यात १ ते ३ पोते एकरी उत्पादन हाती येत आहे. पुढील टप्प्यात यापेक्षा वेगळी पीक उत्पादन स्थिती संभवत नाही. यामुळे शेतकऱ्यांना मदत गरजेची झाली आहे.