रोखरहित व्यवहाराकरिता रॅलीतून जनजागृती
By Admin | Updated: January 19, 2017 00:34 IST2017-01-19T00:34:15+5:302017-01-19T00:34:15+5:30
येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रभात किरण युवा मंडळ, नेहरू युवा केंद्र वर्धा, ग्रामदूत सेवा केंद्र

रोखरहित व्यवहाराकरिता रॅलीतून जनजागृती
भजनी मंडळाचा सहभाग : ‘गाव कॅशलेस’ करण्याचा निर्धार
अल्लीपूर : येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रभात किरण युवा मंडळ, नेहरू युवा केंद्र वर्धा, ग्रामदूत सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावात रोखरहीत व्यवहाराविषयी जागृती करण्यात आली. गावातील नागरिकांनी दवाखाना, हॉटेल, चहा कॅन्टींग, मेडिकलचे दुकान, व्यापारी प्रतिष्ठान येथे रोखरहीत व्यवहार करावा, असा संदेश देण्यात आला.
रोखरहीत व्यवहाराबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलेल्या आवाहनानुसार गावात डेबिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार केले जात आहे. जिल्हाधिकारी नवाल यांनी गावाला भेट देऊन याविषयी माहिती घेतली आहे. गावातील सर्व व्यवहार रोखरहीत करण्याकरिता संस्थेमार्फत ग्रामस्थांत जागृती करण्यात आली.
इंदिरा गांधी विद्यालय व यशवंत विद्यालयाचे विद्यार्थी, भजन मंडळी यांच्या सहभागाने गावातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. यावेळी सरपंच मंदा पारसडे, उपसरपंच विजय कवडे, ग्रामविकास अधिकारी अशोक गव्हाळे, माझी सरपंच गजू नरड, ग्रा.पं. सदस्य इस्त्राईल पठाण, रूपाली साखरकर, प्रेमिला बेले, कुसूम मानमोडे, बंडू बगवे, तलाठी सुबोध धोंगडी, प्रभात किरण युवा मंडळाचे अध्यक्ष सतीश काळे, कैलास घोडे, नंदकिशोर साळवे, उमेश ढगे, सचिन पारसडे, तुलसीराम वाघमारे, प्रा. हेमंत पारसडे, आशा सेविका व मदतनीस यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)