वाळत टाकलेल्या हरभऱ्यात शिरले पाणी; वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:18 IST2020-03-11T12:17:37+5:302020-03-11T12:18:25+5:30
मंगळवारी मध्यरात्री आलेल्या अवकाळी पावसाने वर्धा जिल्ह्यातील हरभरा पिकाचे व वाळत घातलेल्या चण्याचे अतोनात नुकसान केले आहे.

वाळत टाकलेल्या हरभऱ्यात शिरले पाणी; वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस
ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यात धान व चणा उध्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/ भंडारा: मंगळवारी मध्यरात्री आलेल्या अवकाळी पावसाने वर्धा जिल्ह्यातील हरभरा पिकाचे व वाळत घातलेल्या चण्याचे अतोनात नुकसान केले आहे. तळेगाव परिसरात वादळी वाºयासह जोरात पाऊस झाला. यात काही शेतकऱ्यांच्या शेतातील वेचणीस आलेला कापूस ओलाचिंब झाल्याने जमिनीवर पडला. काढणीस आलेल्या गव्हालाही पावसाने झोडपले तर चण्याच्या गंजीत पाणी शिरून त्याचे नुकसान झाले. या पावसाचा फटका वायगावच्या हळदीलाही झाला आहे.
भंडारा जिल्ह्यात चणा व धानाचे पीक अक्षरश: आडवे झाले आहे. या परिसरात कापूस, गहू, धान आदी पिके पावसामुळे नष्ट झाली आहेत.