घन ओथंबून येती़़ग़ाण्यातील पाऊसही बेपत्ताच
By Admin | Updated: July 10, 2014 23:45 IST2014-07-10T23:45:49+5:302014-07-10T23:45:49+5:30
‘घन आथंबून येती, बनात राघू ओजिरती, पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती, घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती, डोंगर लाटा वेढीत वाटा, वेढीत मजला नेती़़़’ हे गाणे एकेकाळी प्रसिद्ध होते़

घन ओथंबून येती़़ग़ाण्यातील पाऊसही बेपत्ताच
विजयगोपाल : ‘घन आथंबून येती, बनात राघू ओजिरती, पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती, घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती, डोंगर लाटा वेढीत वाटा, वेढीत मजला नेती़़़’ हे गाणे एकेकाळी प्रसिद्ध होते़ या कवितेतील पाऊस यावर्षी प्रत्यक्षात बरसलाच नाही़ यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे ढग अधिकच गडद होताना दिसून येत आहे़
एन महिन्यात रोहिणीनंतर मृग कोरडा गेला़ आर्द्राकडून अपेक्षा असताना या नक्षत्राने निराशाच केली. जून संपून जुलै महिना सुरू झाला तरीही पावसाने हजेरी लावली नाही. कालपासून पुनर्वसू नक्षत्र लागले असून सर्वांच्या नजरा आकाशावर भिडल्या आहेत. गत दोन दिवसांपासून तर घन ओथंबून येतील, अशीच सर्वांना पावसाची हूरहूर लागली आहे़ पावसाच्या दडीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचेच दिसून येत आहे़ पावसाळ्यातील जून महिन्यात मृग व आर्द्रा ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली तर जुलै महिन्यात ६ जुलैपासून पुनर्वस् नक्षत्र सुरू झाले असून या नक्षत्राच्या मुहूर्तावर आकाशात केवळ ढग दाटून येत आहेत; पण पावसाची एक सरही कोसळली नाही. यंदा पुनर्वसू नक्षत्राचे ‘गंदर्भ’ हे वाहन असून गंदर्भ जिकडे जाते तिकडेच चालले जाते, म्हणजे कुठे पाऊस पडेल व कुठे ढग कोरडेच फिरतील, अशीच काहीशी स्थिती दिसत आहे. पावसाच्या हुलकावणीने जलस्त्रोताची पातळीही खालावत आहे. यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट निर्माण होऊन भविष्यात भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील विजयगोपाल, इंझाळा, तांभा (येंडे), सावंगी (येंडे), हिवरा (कावरे), मलातपूर, रोहणी (वसू) चोंढी यासह इतर गावांतील काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे़ त्यावर निसर्गाच्या अवकृपेमुळे बहुतांश धूळपेरणी वाया गेली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे महाग बियाणे मातीत गेले आहे. अनेक शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. या दिवसांत पूरजन्य स्थितीमुळे नदी-नाले साफ स्वच्छ होऊन दुथडी भरून वाहत असतात; पण निसर्गाच्या विचित्र बदलामुळे नदी-नाले व इतर जलस्त्रोत कोरडे ठण्ण पडले आहेत़ काही नदी नाल्यांत थोड्या प्रमाणात जलसाठा असून त्यातही शेवाळ व कचरा घाण साचल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे़ प्रदूषण वाढले आहे. पाऊस नसल्याने नदी-नाले व अन्य जलस्त्रोत अस्वच्छ झालेत़ पावसाच्या हुलकावणीमुळे सर्वांचीच चिंता वाढत असल्याचे दिसते़(वार्ताहर)