रेल्वे स्थानक झाले ‘क्लिन’

By Admin | Updated: February 26, 2017 00:56 IST2017-02-26T00:56:48+5:302017-02-26T00:56:48+5:30

बसस्थानक आणि रेल्वे स्थानक ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे असतात. या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे असते;

Railway station gets 'clean' | रेल्वे स्थानक झाले ‘क्लिन’

रेल्वे स्थानक झाले ‘क्लिन’

अभिनव उपक्रम : पथनाट्यातून रेल्वे प्रवाशांत जागृती
वर्धा : बसस्थानक आणि रेल्वे स्थानक ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे असतात. या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे असते; पण प्रवाशांकडून विविध प्रकारचा कचरा होत असतो. हा कचरा साफ करून संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वर्धा रेल्वे स्थानक क्लिन केले. सोबतच पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. हा अभिनव उपक्रम पाहून रेल्वे प्रवाशांनाही हायसे वाटले.
गुरूवारी शहरातील रेल्वे स्थानकावर संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छ वर्धा सुंदर वर्धा हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिला, युवतींनी फलाट धुवून तथा रेल्वे स्थानकावरील रंगलेल्या भिंती पुसून फलाटावर साचलेली घाण दूर केली. फलाटावरील प्रत्येक बाक, रंगलेला खांब, बापुकूटीची प्रतिकृती असलेल्या परिसरात रंगलेल्या भिंती साफ करीत घाण स्वच्छ केली. संपूर्ण फलाट झाडून स्वच्छ करण्यात आला. रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक ते चारवर हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे २० ते ३० पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ केला. शिवाय मुख्य तिकीट घराच्या भिंती, काचाही स्वच्छ करण्यात आल्यात.
दरम्यान, फाऊंडेशनमध्ये सहभागी विद्यार्थी, युवकांनी फलाट क्रमांक एकवर स्वच्छतेबाबत पथनाट्य सादर केले. पथनाट्यातून रेल्वे प्रशावांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात आली. शिवाय रेल्वे प्रवाशांकडून स्वच्छता राखण्याबाबत वचनही घेण्यात आले. रेल्वे स्थानकावर सादर होत असलेले पथनाट्य पाहून प्रवासीही थांबून बोध घेत होते. रेल्वेस्थानकावर गुरूवारी सकाळपासून सुरू असलेला हा उपक्रम प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होता. या उपक्रमातून स्वच्छतेबाबत जनजागृती तर झालीच, शिवाय रेल्वेस्थानकही ‘क्लिन’ झाले.(कार्यालय प्रतिनिधी)

 

Web Title: Railway station gets 'clean'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.