शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे आरक्षण तिकिटांची लिंक फेल ! दीड महिन्यापसून लिंक फेल असल्यामुळे नागरिकांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:13 IST

Wardha : पुणे, मुंबईत येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पंचाईत

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : बीएसएनएलची लिंक फेल असल्याकारणाने देवळीच्या पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे आरक्षणाची तिकिटे मिळणे बंद झाले आहे. मागील दीड महिन्यापासून ही परिस्थिती निर्माण झाल्याने, देवळी व परिसरातील नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. याबाबत पाठपुरावा करूनसुद्धा सुधारणा होत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. समस्येकडे खासदार अमर काळे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

शासनाच्या निर्णयानुसार मागील काही दिवसांपासून देवळीच्या पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे आरक्षणाची सुविधा मिळत आहे. त्यामुळे ही व्यवस्था देवळीकर नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण तसेच दिलासा देणारी ठरली आहे. परंतु मागील दीड महिन्यापासून बीएसएनएल प्रशासनाच्या चुकीमुळे ही सेवा बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील शेकडो विद्यार्थी पुणे, मुबंई तसेच इतर मोठ्या शहरात शिक्षणासाठी तसेच नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. त्यामुळे लागत आहे. शिवाय परतीच्या प्रवासात बाहेर गावी जावे लागत आहे. लींक फेल असल्या कारणाने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे.

बसतोय आर्थिक भुर्दडउपलब्ध असलेल्या सुविधांचा लाभ घेता येत नसल्याने अनेकानी खासगीतून तिकीट बुकिंग केले जात आहे. यासाठी अतिरीक्त शुल्क वसूल केले जात आहे.

दीड महिन्यापासून सेवा बंद देवळीतील औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने कार्यरत असून, याठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची तसेच कामगारांची संख्या मोठी आहे. बाहेरील राज्यांतील शेकडो अधिकारी व कामगार येथे सेवेत असल्याने त्यांना राहत्या गावी जाण्यासाठी तसेच परत येण्यासाठी रेल्वे आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे देवळीत आरक्षित तत्काळ तिकिटांची तसेच नियमित रेल्वे आरक्षणाची व तिकिटांची व्यवस्था आवश्यक ठरली आहे. परंतु मागील दीड महिन्यापासून ही सेवा बंद असल्याने प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. लिंक फेल असल्याने रेल्वेचे आरक्षण मिळणे ठप्प झाले आहे. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनसुद्धा व्यवस्था होत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. माजी नगरसेवक सुनील बासू व शिक्षण संस्थेचे सचिव अब्दुल रहेमान तंवर यांनी खासदार अमर काळे यांची भेट घेऊन तसेच त्यांना निवेदन देऊन देवळीच्या रेल्वे आरक्षणाची सुविधा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाrailwayरेल्वे