शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

भाजप शहर अध्यक्षाच्या घरावर रेल्वे विभागाचा छापा; पिता-पुत्राची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:27 AM

सुमारे दोन तास अधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली.

वर्धा : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केल्या जात असल्याचा ठपका ठेवत वर्धा येथील भाजप शहर अध्यक्ष पवन परियाल यांच्या निवासस्थानी मंगळवारी दुपारी रेल्वे विभागाच्या नागपूर येथील चमूने छापा टाकला. त्यानंतर सदर चमूतील अधिकाऱ्यांनी पवन परियाल व त्यांच्या मुलाला ताब्यात घेत सुमारे दोन तास विचारपूस केली. चौकशी अंती सदर पिता-पुत्रास सोडून देण्यात आले आहे.रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे जिल्ह्यात चांगलेच सक्रीय आहेत. अशाच गैरप्रकार करणाऱ्यांवर वेळोवेळी छापा टाकून रेल्ये विभागाच्यावतीने कारवाईही केली जाते. पवन परियाल व त्यांचे पूत्र रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने रेल्वे विभागाच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी परियाल यांच्या घरी छापा टाकला होता.

त्यानंतर रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करता असा ठपका ठेऊन परियाल पिता-पुत्रांना ताब्यात घेऊन वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात नेण्यात आले. तेथे सुमारे दोन तास अधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली. त्यानंतर दोघांनाही सोडून देण्यात आल्याचे सदर चमूतील कनोजिया नामक अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची चमू आली होती. त्यांनी आम्हाला ताब्यात घेत विचारपूसही केली. परंतु, त्यांना काहीच मिळाले नसल्याने त्यांनी आम्हाला सोडून दिले, हे वास्तव आहे. पवन परियाल ( भाजप शहर अध्यक्ष, वर्धा )