शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

रेल्वे उड्डाणपुलाचे काम थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

ग्रामीण भागाचा विकास व्हावा या हेतूने नागपूर-औरंगाबाद हा ३८६ कि.मी. चा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. शिवाय हैदराबाद-भोपाल या राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक गावे मोठ्या शहरांशी जोडली जाणार आहेत. तर भद्रावती-पुलगाव-आमला ही महत्त्वाची केंद्र जोडली जाणार आहेत.

ठळक मुद्देफाटक राहते नेहमी बंद : समस्येकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

प्रभाकर शहाकार।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : येथील राष्ट्रीय मार्ग अनेकदा दुरूस्तीचे काम हाती घेतल्यानंतर गुळगुळीत करण्यात आला. परंतु, वाहनचालकांसाठी सर्वात मोठी समस्या ठरु पाहणाऱ्या पुलगाव येथील रेल्वे उड्डाण पुलाची समस्या जैसे थे असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.ग्रामीण भागाचा विकास व्हावा या हेतूने नागपूर-औरंगाबाद हा ३८६ कि.मी. चा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. शिवाय हैदराबाद-भोपाल या राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक गावे मोठ्या शहरांशी जोडली जाणार आहेत. तर भद्रावती-पुलगाव-आमला ही महत्त्वाची केंद्र जोडली जाणार आहेत.असे असले तरी पुलगाव येथील रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे फाटक नेहमीच बंद राहत असल्याने तेथे वाहतुकीची कोंडी होते. रेल्वे उड्डाण पुलासाठी एक-दोन कोटी नव्हे तर तब्बल ४५ कोटी मंजूर झाले आहेत. असे असले तरी मागील सात वर्षांपासून काम कासवगतीनेच केले जात आहे. त्यामुळे पुलगाव येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.खासदारांच्या प्रयत्नाअंती २१ पिलर्स उभेउड्डाणपूलाचा प्रश्न रेंगाळत असल्याचे लक्षात येताच खा. रामदास तडस यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर उड्डाण पुलाच्या ३४ पिलर्स पैकी २१ पिलर्सचे काम सुरू झाले. शिवाय नाल्यावर दोन पुलही बांधण्यात आले. नाचणगाव रोड ते पंचधारा मार्गाचे दोन्ही बाजूने रूंदीकरण करून खडीकरणही करण्यात आले. पण सध्या हे काम बंद आहे.४५ कोटींचा निधी मंजूरवाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन राज्य व केंद्र शासनाने ६५६ मिटर लांबी व १२ मिटर रूंदी असलेल्या तीन पदरी मार्गाला मान्यता दिली. तसेच राज्य शासनाचे ३५ कोटी व रेल्वे विभागाचे १० कोटी असे ४५ कोटींचा निधी उड्डाणपुलासाठी मंजूर झाला. रेल्वे विभागाचे तीन पिलर्स मिळून एकूण ३४ पिलर्सवर हा उड्डाणपुल उभा राहणार आहे.रणजीत कांबळेंनी केले भूमिपूजननियोजन प्रकरण क्र. ६७९/नियोजन-३ २७ मे २०१४ अन्वये राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देवून बांधकामाच्या निविदाही काढल्या. जून २०१४ मध्ये पुरवणी अर्थ संकल्पात नव्याने समाविष्ठ करून आर्थिक तरतूदही करण्यात आली. इतकेच नव्हे तर तत्कालीन मंत्री तथा विद्यमान आ. रणजीत कांबळे यांच्या हस्ते आॅगस्ट २०१४ मध्ये भूमिपूजनाचा सोपस्कार पूर्ण झाला. मात्र, उड्डाण पुलाचे काम कासवगतीनेच होत आहे.मुख्य कंत्राटदार व सह कंत्राटदार यांच्यात वाद झाल्यामुळे कंत्राटदाराने काम सोडल्याचे आणि त्याचा परिणाम या उड्डाण पुलाच्या बांधकामावर झाल्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात. इतकेच नव्हे तर गुजरात येथील दुसऱ्या कंपनीच्या साझ्याने काम सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. बांधकाम विभागाने उड्डाण पुलाचे काम तात्काळ पूर्णत्त्वास नेले पाहिजे. शिवाय कामात हयगय करणाºया कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे.- रामदास तडस, खासदार, वर्धा.

टॅग्स :railwayरेल्वे