शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अमृत ट्रेडर्सवर छापा; ३६ हजारांचा गुटखा जप्त, आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 18:15 IST

उपविभागीय पोलिस पथकाची कारवाई

वर्धा : रेल्वेस्थानक समोरील रस्त्यावर असलेल्या अमृत ट्रेडर्समध्ये पोलिसांनी छापा मारुन गोदामातून प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा असा ३६ हजार ९३६ रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस पथकाने २० रोजी केली. अमर मुलचंद गेलानी (४५) रा. दयालनगर असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर नवीन सुरेशकुमार आहुजा रा. दयालनगर हा फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यालगत असलेल्या अमृत ट्रेडर्स दुकानात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दुकानावर छापा मारला असता आरोपी अमर मुलचंद गेलानी याच्या गोदामातून सुगंधित तंबाखूने भरून असलेले सीलबंद असलेले ५४ पाकिटे, सुगंधित पान मसाला (गुटखा) चे ४८ पॅकेट आदी असा ३६ हजार ९३६ रुपयांचा गुटखा जप्त केला.

पान मटेरियल, गुटखा, सुगंधित तंबाखू त्याने नवीन सुरेशकुमार आहुजा याच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी अमर गेलानी याला अटक केली तर नवीन आहुजा याचा शोध पोलिस घेत आहेत. दोघांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक परवेज खान, संजय गायकवाड, अमर लाखे, पवन निलेकर, समीर शेख, मंगेश चावरे, प्रमोद वाघमारे, राजू वैध, संदीप अलोणे, किरण गेडाम, अन्न सुरक्षा अधिकारी राजेश यादव, अमित तृपताने यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTobacco Banतंबाखू बंदीwardha-acवर्धा