राहुल-प्रियांका गांधी सेनेचा होणार विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:11+5:30

राहुल-प्रियांका गांधी सेना (काँग्रेस)चा जिल्ह्यात विस्तार केला जाणार आहे. गावपातळीपासून कार्यकर्ते जोडून सर्व सामान्यांचे प्रश्न या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार समोर ठेवून त्याची सोडवणूक केली जाणार आहे, असे प्रतिपादन राहुल प्रियांका गांधी सेना प्रदेशाध्यक्ष अभिजित पाटील फाळके यांनी केले.

Rahul-Priyanka Gandhi Army to expand | राहुल-प्रियांका गांधी सेनेचा होणार विस्तार

राहुल-प्रियांका गांधी सेनेचा होणार विस्तार

ठळक मुद्देअभिजित पाटील फाळके : हिंगणघाट येथे पदग्रहण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राहुल-प्रियांका गांधी सेना (काँग्रेस)चा जिल्ह्यात विस्तार केला जाणार आहे. गावपातळीपासून कार्यकर्ते जोडून सर्व सामान्यांचे प्रश्न या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार समोर ठेवून त्याची सोडवणूक केली जाणार आहे, असे प्रतिपादन राहुल प्रियांका गांधी सेना प्रदेशाध्यक्ष अभिजित पाटील फाळके यांनी केले. हिंगणघाट येथे तालुका पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा तेजस्वी बारबव्दे, वर्धा जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक प्रविण पेठे, योगेश घोगरे, पंकज इंगोले, हिंगणघाटचे माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, ज्वलंत मून, मंगला ठक आदी उपस्थित होते. बैठकीत हिंगणघाट तालुका अध्यक्षपदी काशीराम गुळघाणे, जिल्हा उपाध्यक्षपदी हरीश ढगे, हिंगणघाट तालुका उपाध्यक्षपदी निखील जवंजाळ, सचिवपदी आरिफ शेख, तालुका संघटकपदी रविकिरण कुटे, सहसचिवपदी मोहन तुमराम यांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: Rahul-Priyanka Gandhi Army to expand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.