घर खाली करण्यावरून राडा

By Admin | Updated: February 17, 2016 01:41 IST2016-02-17T01:41:24+5:302016-02-17T01:41:24+5:30

घर खाली करण्याच्या कारणावरून भामटीपूरा येथे सोमवारी रात्री चांगलाच राडा झाला. यात एका महिलेच्या तक्रारीवरून

Rada has to do it from home | घर खाली करण्यावरून राडा

घर खाली करण्यावरून राडा

वर्धा : घर खाली करण्याच्या कारणावरून भामटीपूरा येथे सोमवारी रात्री चांगलाच राडा झाला. यात एका महिलेच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील हल्लेखोर एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याने त्याच्या समर्थकांनी शहर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.
फिरोज मस्तानखान पठाण (४१) रा. जाकीर हुसेन कॉलनी याला अटक करण्यात आली. तो एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती आहे. त्याच्यासह आसिफ खान हामीमद खान रा. जाकीर हुसेन कॉलनी आणि आकाश भीमराव जीवतोडे रा. हुनमान नगर अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. यातील फिरोज मस्तान शहर ठाण्यात तक्रार देण्याकरिता आला असतानाच अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अन्य दोघांनाही याच वेळी अटक करण्यात आली. या तिघांवर भादंविच्या कलम ४५२, ५०४, ५०६ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फिरोज मस्तान याच्या पत्नीने तक्रार दिली असून ती चौकशीत ठेवण्यात आली आहे. तिच्या तक्रारीनुसार मोहन भट याने तिच्या घरात शिरून तिला मारहाण केल्याचे म्हटले असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

फिरोज मस्तानच्या पत्नीची तक्रार चौकशीत
४या प्रकरण घडताच फिरोज मस्तान व त्याची पत्नी शहर ठाण्यात तक्रार देण्यातकरिता आली. मोहन भट याने तिच्या घरात शिरून तिला मारहाण केल्याचा उल्लेख केला आहे. शिवाय त्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्रही हिसकावल्याचे म्हटले आहे. याची माहिती फिरोजच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात चांगलीच गर्दी केली होती. या तक्रारीवर पोलिसांना संशय आल्याने ही तक्रार चौकशीत ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Rada has to do it from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.