खरीपासोबतच रबीचीही चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:21 IST2017-09-09T23:21:26+5:302017-09-09T23:21:40+5:30
शासन बदलल्याने आशाही वाढल्या. शासनाकडून आश्वासनांची खैरात वाटणे सुरूच आहे. असे असले तरी शेतकरी कुणाची प्रतीक्षा न करता आपल्याच कामात व्यस्त आहेत.

खरीपासोबतच रबीचीही चिंता
विजय माहुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू/घोराड : शासन बदलल्याने आशाही वाढल्या. शासनाकडून आश्वासनांची खैरात वाटणे सुरूच आहे. असे असले तरी शेतकरी कुणाची प्रतीक्षा न करता आपल्याच कामात व्यस्त आहेत. आज ना उद्या आर्थिक स्थिती सुधारेल, या अपेक्षेत कष्ट उपसणाºया शेतकºयांना आता खरीप हंगामासोबतच रबीचीही चिंता सतावत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी अनेक संघटना पूढे आल्या. सत्ता गेल्यावर शेतकºयांची आठवण येणाºया राजकीय पक्षांचे यात्रा व मोर्चे पाहिले. सत्तेत नसताना शेतकºयांच्या प्रश्नावर भावनिक आंदोलन करून ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्तेत आले; पण शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, हे कुणाच्या लक्षातच आले नाही. खरीप हा शेतकºयांच्या वर्षभराच्या खर्चाचा भार उचलणारा हंगाम असतो. या हंगामात शेतातील पिके हिरवीगार दिसतील एवढाच पाऊस आला. यानंतर उन्हही तापू लागल्याने शेतातील पिकांना पाहिजे त्या प्रमाणात फळधारणा झाली नाही. परिणामी, खरीपाचे आर्थिक गणित कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन व कपाशी या दोन्ही पिकांवर अत्यल्प पावसामुळे अनेक रोगांनी तथा अळ्यांनी आक्रमण केले आहे. यामुळे ही दोन्ही पिके कितपत हाती येतात, हा प्रश्नच आहे. परिणामी, खरीप हंगाम धोक्याचा तर ठरणार नाही ना, ही चिंता शेतकºयांना त्रस्त करीत आहे.
सेलू तालुक्यातील शेतकºयांना रबी हंगामात आर्थिक सुबत्ता देणाºया यशवंत धरणात पावसाच्या कमतरतेमुळे जलसंचयच झाला नाही. यामुळे यावर्षी रबी हंगामात पाटाचे पाणी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून हे वर्षही शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटीत करणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. समाधानकारक पाऊस येणार, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. यामुळे शेतकºयांनी जोमाने कपाशी, सोयाबीन, तुरीची पेरली केली; पण दरवर्षीप्रमाणे पावसाने हुलकावणी दिली. यंदा तर सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. यामुळे हिरवी दिसत असली तर अनेक रोग, अळ्यांमुळे पिकांवर मरगळ आल्याचे दिसून येत आहे. आता रबी हंगामालाही पाणी मिळणे कठीण असल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाल्याचेच दिसते.