शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

हजसाठीचा कोटा 70 वरून 90 टक्के व्हावा, जमाल सिद्दिकींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 17:38 IST

जमाल सिद्दीकी : यंदा हज यात्रेला दोन लाख लोक जाणार

वर्धा : हज यात्रेसाठी सर्वात जास्त यात्रेकरू पाठविणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिला क्रमांक इंडोनेशीयाचा आहे. भारतातून गतवर्षी 1 लाख 75 हजार मुस्लिम बांधव हज यात्रेला गेले होते. तर यावर्षी सुमारे 2 लाख मुस्लिम बांधव हज यात्रेला जाणार आहे. हज समितीच्या कोट्यातून सदर यात्रेसाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता हज समितीचा कोटा 70 वरून 90 टक्के करण्यात यावा, अशी मागणी हज समितीचे राज्याध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली.

ना. जमाल सिद्दिकी पुढे म्हणाले, वर्धा जिल्ह्यातून 64 इच्छुकांनी हज यात्रेला जाण्यासाठी आवेदन केले आहे. त्यापैकी 48 मुस्लिम बांधव यंदा हज यात्रेसाठी जाणार आहे. तर महाराष्ट्राचा विचार केल्यास हा आकडा 16 हजार इतका आहे. राज्यातून यंदा 35 हजार 711 अर्ज प्राप्त झाले आहेत. मोदी सरकारने हज जाणाऱ्यांच्या कोट्यात 25 टक्क्यांनी वाढ केल्याने याचा प्रत्यक्ष लाभ मुस्लिम बांधवांना होत आहे. यंदा 14 जुलैपासून हज यात्रेकरू त्यांच्या पुढील प्रवासासाठी रवाना होणार आहेत. महाराष्ट्रातील हज यात्रेसाठी जाऊ इच्छीणारे मुस्लीम बांधव आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या हैद्राबाद आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई व उपराजधानी असलेल्या नागपूर तसेच औरंगाबाद येथून पुढील प्रवासासाठी जाणार आहे. 

हज यात्रेकरूंना सुविधा मिळावी या हेतुने जिल्हा स्तरावर लवकरच समितींचे गठण होणार आहे. या समितीत अध्यक्ष, उपाध्यक्षासह एकूण 11 सदस्य राहणार आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात सुमारे 30 हाजी दोस्त नियुक्त केले जाणार आहेत. सद्यस्थितीत हज समितीच्या माध्यमातून हज यात्रेसाठी जाणाऱ्यांना सुमारे दोन ते अडीच लाखांचा खर्च येतो. याशिवाय खासगी कंपन्या चार ते साडेचार लाखांमध्ये मुस्लीम बांधवांना हज यात्रा घडवते. हज यात्रेवरील खर्च कमी व्हावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पाण्यातील जहाजाचा वापर हज यात्रेसाठी कसा करता येईल, यासाठी सध्या विशेष प्रयत्न होत आहेत. हज यात्रेकरूंची कुठल्याही पद्धतीने फसवणूक होऊ नये म्हणून एच.ओ.जी. नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले असून त्यावर अधिकृत एजन्सींची माहिती आहे. शिवाय हजसाठी गेलेल्यांना सुविधा व्हावी म्हणून हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला असून तो त्यांच्यासाठी फायद्याच्या ठरणार आहे. कुठलीही खासगी कंपनी हज यात्रेकरूंना करारानुसार सुविधा पुरवित नसेल तर त्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासारखी कठोर कारवाई केल्या जाणार असल्याचेही यावेळी ना. जमाल सिद्दिकी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला फैय्याझ खान, बिस्मील्ला खान, रहीम हाजी, फारूक भाई, तौफिक नुरानी आदींची उपस्थिती होती.

डॉलरची किंमत वाढल्याने हजचा खर्च वाढलाडॉलरची किंमत वाढल्याने हज यात्रेचा खर्च वाढला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात सबसीडी दिल्या जात असे. त्याचा प्रत्यक्ष फायदा केवळ एअर लाईन कंपन्यांना मिळत होता. हाजींनी सरकारचा एक रुपया घेतला नसून उलट ते देत आहेत. मुस्लिम बांधव कुणाच्या पैशावर हजला जात नाही. मोदी सरकारने त्यांच्या कार्यकाळात मुस्लिम बांधवांच्या माथी असलेला कलंक पूसला आहे, असेही यावेळी ना. जमाल सिद्दिकी यांनी स्पष्ट केले.

हिंदी विश्व विद्यालयास भेटजमाल सिद्दीकी यांनी वर्ध्यातील महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाला सदिच्‍छा भेट दिली. यावेळी कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल यांनी त्‍यांचे शॉल आणि स्‍मृतिचिन्‍ह देवून स्‍वागत केले. याप्रसंगी कार्यकारी कुलसचिव प्रो. कृष्‍ण कुमार सिंह, हिंदी अधिकारी राजेश कुमार यादव प्रामुख्‍याने उपस्थित होते. कुलगुरु प्रो. शुक्‍ल यांनी शैक्षणिक कामकाजांची माहिती दिली. जमाल सिद्दीकी यांनी विश्‍वविद्यालयाच्‍या कार्याची प्रशंसा केली. विश्‍वविद्यालय वर्धेत असल्‍याने त्‍याचा लाभ आसपासाच्‍या भागातील विद्यार्थ्‍यांना होत असल्‍याबद्दल त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. 

टॅग्स :Haj yatraहज यात्राwardha-pcवर्धाMuslimमुस्लीम