पुलगाव डेपोतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार

By Admin | Updated: May 5, 2016 02:14 IST2016-05-05T02:14:16+5:302016-05-05T02:14:16+5:30

पुलगाव डेपो येथे आरोग्य विभागातर्फे सीजीएचएस सुविधा देण्यात यावी. केंद्रीय कर्मचारी आवासाकरिता ३०० नवीन क्वॉर्टर निर्माण करावे.

The questions of employees of Pulgoon Depot will be started | पुलगाव डेपोतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार

पुलगाव डेपोतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार

पुलगाव : पुलगाव डेपो येथे आरोग्य विभागातर्फे सीजीएचएस सुविधा देण्यात यावी. केंद्रीय कर्मचारी आवासाकरिता ३०० नवीन क्वॉर्टर निर्माण करावे. यासह एरिया अकाऊंट आॅफीस पुलगाव किंवा नागपूर येथे व्हावे आदी मागण्यांकरिता केंद्रीय सुरक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांची मंगळवारी खा. रामदास तडस व पुलगाव येथील भारतीय प्रतिरक्षा भांडार मजदूर संंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. याप्रसंगी ना. पर्रीकर यांनी सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन खा. तडस व शिष्टमडळाला दिले.
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठा अ‍ॅम्युनिशन डेपो आहे. डेपोमध्ये तीन हजारांच्या वर सैनिक व इतरही कर्मचारी कार्यरत आहे. भारतातील सर्र्व अ‍ॅम्युनिशन डेपोमध्ये केंद्र शासनाच्या स्वास्थ विभागाकडून सीजीएचएस सुविधा पुरविण्यात येते. पण पुलगाव शहर हे लहान असल्यामुळे येथे ही सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे ही सुविधा पुलगावातही देण्यात यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून कर्मचारी करीत आहे. तसा प्रस्तावही पाठविलेला आहे. तसेच गैरसैनिक कर्मचारी वर्गाकरिता ३०० नवीन क्वॉर्टरचा प्रस्ताव पाठविण्यात आला.

Web Title: The questions of employees of Pulgoon Depot will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.