पी.व्ही. टेक्सटाईल्सने भागविली ग्रामीण रुग्णालयाची तहान
By Admin | Updated: May 26, 2016 00:35 IST2016-05-26T00:35:56+5:302016-05-26T00:35:56+5:30
ग्रामीण रुग्णालयात पाणी नाही, हे वृत्त वाचताच सामाजिक दायित्वाचा हात समोर करीत पी.व्ही. टेक्सटाईल्स जामने ...

पी.व्ही. टेक्सटाईल्सने भागविली ग्रामीण रुग्णालयाची तहान
समुद्रपूर : ग्रामीण रुग्णालयात पाणी नाही, हे वृत्त वाचताच सामाजिक दायित्वाचा हात समोर करीत पी.व्ही. टेक्सटाईल्स जामने बोरवेलच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची तहान भागविली. या कंपनीने ‘जलमित्र’ झाल्याचाच परिचय दिला आहे.
ग्रामीण रुग्णालयात पाणी नाही, हे वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त पी.व्ही. टेक्सटाईल्सचे व्यवस्थापक भुपेंद्र शहाणे यांनी वाचले. यावरून त्यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी चर्चा करून पाण्याची व्यवस्था कशी करता येईल, याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. तेव्हा ग्रामीण रुग्णालयात बोरवेल तयार करण्याबाबत ठरले. तसा प्रस्ताव शहाणे यांनी पी.व्ही. टेक्सटाईल्सचे संचालक अरुण मोहता यांच्यासमोर ठेवला. त्यांनी त्वरित बोरवेलसाठी मान्यता देत निधी उपलब्ध करून दिला. मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात बोरवेलचे काम सुरू झाले. शिवाय दोन इंच पाणीही लागले. सदर बोरवेल पूजनाप्रसंगी व्यवस्थापक भुपेंद्र शहाणे, नगर पंचायत अध्यक्ष शीला सोनारे, उपाध्यक्ष रवींद्र झाडे, पाणी पुरवठा सभापती गजानन राऊत, नगरसेवक प्रवीण चौधरी, प्रा. मेघश्याम ढाकरे, सुधीर खडसे, कुलकर्णी, मनीष गांधी, अतुल बावणे, धोटे आदी उपस्थित होते. यावेळी रुग्ण व नागरिकांनी जलमित्र कंपनीबाबत समाधान व्यक्त केले. रुग्णालयाचे अधिकारी हजर राहू शकले नाही.(तालुका प्रतिनिधी)