शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

‘पुष्पा’ शोधतोय नैसर्गिक अधिवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा आणि पवनार ते आंजी (मोठी) असा आतापर्यंतचा प्रवास करणारा हा वाघ नेमका कोणता, तो कुठून आला आदी बाबींचा शोध वनविभाग घेत असला तरी  तरी वाघाच्या मागावर असलेले वनविभागाचे अधिकारी या रुबाबदार वाघाला ‘पुष्पा’ असेच संबोधित आहेत. एकूणच तरुण वाघ नैसर्गिक अधिवास शोधत असून त्याचा मार्गही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोकळा करून देत आहेत.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अडीच ते तीन वर्षं वयोगटातील एक तरुण वाघ आपला नैसर्गिक अधिवास शोधत असून, सध्या तो आंजी (मोठी) शिवारात आहे. या भागात लोकवस्ती असल्याने वनविभागाचे अधिकाऱ्यांच्या तीन चमू परिसरातील ग्रामस्थांना मार्गदर्शक सूचना देत वाघाच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा आणि पवनार ते आंजी (मोठी) असा आतापर्यंतचा प्रवास करणारा हा वाघ नेमका कोणता, तो कुठून आला आदी बाबींचा शोध वनविभाग घेत असला तरी  तरी वाघाच्या मागावर असलेले वनविभागाचे अधिकारी या रुबाबदार वाघाला ‘पुष्पा’ असेच संबोधित आहेत. एकूणच तरुण वाघ नैसर्गिक अधिवास शोधत असून त्याचा मार्गही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोकळा करून देत आहेत.

आंजी (मोठी)सह परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा-  खरांगणा (मोरांगणा) नजीकच्या ढगा जंगलाकडे जाणाऱ्या या वाघाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप जाता यावे, यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. -  याच विशेष प्रयत्नांचा एक भाग म्हणून आंजी (मोठी)सह पेठ, नरसुला, पुलई, डोर्ली यासह परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. -   मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष टाळता यावा यासाठी ग्रामस्थांनी काय करावे, तसेच काय करू नये याबाबतची माहिती वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या गावांमध्ये जात सांगत आहेत.

नऊ कॅमेऱ्यांचा वॉच-  नैसर्गिक अधिवास शोधत असलेल्या या तरुण वाघाच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने तब्बल नऊ ट्रॅप कॅमेरे ठिकठिकाणी लावले आहेत. याच ट्रॅप कॅमेऱ्यांत हा तरुण वाघ कैद झाला असून तो नेमका कुठला, याबाबतची माहिती वनविभागाचे अधिकारी वन्यजीव संरक्षण विभागाकडून जाणून घेत आहेत.

नदी-नाल्याच्या काठाने करतोय मार्गक्रमण -  आपला नैसर्गिक अधिवास शोधत असलेला हा तरुण वाघ मोठा रुबाबदार असून, त्याने आतापर्यंत पवनार ते आंजी (मोठी) असा सुमारे २५ किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. या प्रवासादरम्यान त्याने कुठल्याही मनुष्याला इजा पोहोचविलेली नाही. तो नदी आणि नाल्याच्या काठा-काठानेच आपला पुढील प्रवास करीत आहे.

अडीच ते तीन वर्षं वयोगटातील एक तरुण वाघ सध्या आपला नैसर्गिक अधिवास शोधत आहे. या वाघाच्या प्रत्येक हालचालींवर वनविभागाचे बारकाईने वॉच असून नऊ ट्रॅप कॅमेरेही आवश्यक ठिकाणी लावण्यात आले आहेत. शिवाय तीन चमू या वाघावर लक्ष ठेवून आहेत. कुठलाही अनुचित प्रकार न घडता तरुण वाघ आपल्या नैसर्गिक अधिवासात जावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.- रुपेश खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Tigerवाघ