महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटाच्या काळात कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एकूण ९४.६२ लाखांच्या साहित्याची खरेदी केली आहे. या साहित्यात पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, सोडियम हायपोक्लोराई आदींचा समावेश आहे. नवीन साहित्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला कात टाकण्यासाठी मदत झाली असून सध्या हा विभाग गो-कोरोनाच्या दिशेने पाऊल टाकत आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागालाही अपडेट होणे गरजेचे असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मागील साडे चार महिन्यांच्या काळात विविध साहित्याची खरेदी करण्यात आली आहे.हे साहित्य खरेदी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा नियोजन समिती तसेच एनएचएममधून निधी मिळाला आहे. विशेष म्हणजे या साहित्याची खरेदी केल्यावर ते मागणीनुसार जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्र, अकरा आयुर्वेदिक रुग्णालय तसेच १८१ आरोग्य उपकेंद्रांना वितरीत करण्यात आले आहे. सध्या सर्वच आरोग्य केंद्रात या साहित्याचा मुबलक साठा असून जिल्ह्याची कोरोना स्थितीही नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येते. भविष्यात साहित्याची गरज पडल्यास पुन्हा निधी प्राप्त झाल्यावर साहित्य खरेदी केली जाईल असे सांगण्यात आले.साहित्यासाठी असा झाला निधी उपलब्धकोरोनाला अटकाव घालण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातून १० लाख, जिल्हा नियोजन समितीचा ७५ लाख तर एनएचएमचा ९.६२ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. हा निधी प्राप्त झाल्यावर ई-निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून साहित्य खरेदी करण्यात आले.कोरोनावर मात करणे तसेच प्रत्येक आरोग्य कर्मचारी सुरक्षीत रहावा या हेतूने ही साहित्य खरेदी करून गावपातळीवर हे साहित्य वितरीत करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनीही त्याचा खबरदारीचा उपाय म्हणून वापर केला पाहिजे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.
कोरोना काळात ९४.६२ लाखांची साहित्य खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST
महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोना संकटाच्या काळात कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ...
कोरोना काळात ९४.६२ लाखांची साहित्य खरेदी
ठळक मुद्दे जि.प.आरोग्य विभागाचे ‘कोरोना-गो’ च्या दिशेने पाऊल