पुलगाव तालुका होणारच
By Admin | Updated: October 4, 2015 03:01 IST2015-10-04T02:56:11+5:302015-10-04T03:01:11+5:30
पुलगाव तालुका निर्मितीबाबत पत्रकारांनी विश्राम गृहावर विचारणा केली असता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलणे टाळले.

पुलगाव तालुका होणारच
सुधीर मुनगंटीवार : विद्यार्थ्यांचा सत्कार
पुलगाव : पुलगाव तालुका निर्मितीबाबत पत्रकारांनी विश्राम गृहावर विचारणा केली असता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलणे टाळले. मात्र आपल्या भाषणातून त्यांनी पुलगाव तालुका निर्मितीचा पुनरूच्चार केला. राज्यातील नवीन तालुक्यांची पुनर्रचना करताना पुलगाव शहराचा नव्या तालुक्यांच्या यादीत समावेश राहील, अशीही ग्वाहीही त्यांनी स्थानिक मातृसेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या नियोजित सभागृहाच्या भूमिपूजन गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव समारंभात बोलताना दिली.
गरिबांच्या कल्याणासाठी विकासासाठी मागील १० महिन्यांत शासनाने अनेक कल्याणकारी योजना कार्यरत केल्या असून समाजाच्या तळागाळातील माणसाच्या विकासासाठी राज्यशासन वचनबद्ध आहे, असा ठाम विश्वास अर्थ व नियोजनमंत्री ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघचालक विजय निवल होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, कुंभार समाजाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचा अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, तर रिद्धीसिद्धी भांडे, ओम भोपे, कश्मिरा व्यास, मोहनीश इलमारे, यश गालपिल्लेवार या गुणवंत विद्यार्थ्यांचाही स्मृतिचिन्ह देऊन गुण गौरव करण्यात आला.
मंचावर प्रमुख अतिथीसह आमदार डॉ. पंकज भोयर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, शहर अध्यक्ष नितीन बडगे, कपिल शुक्ला, केशव दांडेकर, संजय गाते, एस.पी. गुघाणे, संस्थाध्यक्ष दीपक कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रस्ताविक अविनाश भोपे यांनी तर संचालन चतारे यांनी केले. ना. मुनगंटीवार पुलगावात दाखल होताच भाजप तसेच नगराध्यक्ष मनीष साहू व मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, ग्रामीण रूग्णालयातर्फे डॉ. गोपाल नारलवार यांनी नगर परिषदेच्यावतीने शाल श्रीफळ देवून जाहीर सत्कार केला. प्रास्ताविक नितीन बडगे तर संचालन मंगेश झाडे यांनी केले.
आधीच्या शासनाने जवळपास ४५० प्रकल्प सुरू केले होते, परंतु एकाचवेळी एवढे प्रकल्प सुरू करताना तिजोरीचा विचार केला नाही. त्यामुळे आमच्या शासनाने सुरू न झालेले व काही नुकतेच सुरू झालेले प्रकल्पाबाबत विचार सुरू आहे. परंतु पुलगाव बॅरेज पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.(तालुका प्रतिनिधी)